Uncategorized आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

चोरट्यांची नजर पंढरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर.

जन संवाद प्रतिनिधी पंढरपूर :-

तीर्थक्षेत्र पंढरीतील छोट्या-मोठ्या चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असतानाच आता चोरांची नजर चोरी शोधण्यासाठी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर गेली आहे. पंढरपूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमे-यांना चोरट्यांनी लक्ष केले आहे.

गेल्या आठ दिवसापासून शहरातील तीन-चार ठिकाणाहून सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. कराड रोड वरील विठ्ठल-रुक्मिणी मंगल कार्यालयातील तीन सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी बुधवारी रात्री लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे पंढरपूर शहरातील पोलिसांना गुन्हेगार शोधण्यास मदत करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लक्ष्य केल्याने पंढरपूर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. वाहनचोरी, दुचाकी चोरी, चेनस्नॅचिंग, पाकीटमारी यासह छोट्या-मोठ्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची संख्या पंढरपूर शहरात खूप आहे. असे चोरीचे लहानमोठे प्रसंग पंढरपूर शहरात वारंवार घडताना दिसतात. विठ्ठल दर्शनासाठी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वर्दळीमुळे लहान-मोठ्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची संख्या लक्षणीय आहे.

पंढरपूर शहर पोलिसांसाठी या चोरट्यांचा बंदोबस्त करणे कायमच जिकिरीचे असते या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अनेक खाजगी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने या कॅमेऱ्यांच्या सह्याने हजारे गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येत असते. परंतु आता त्यांची नजर या कॅमेऱ्यावर गेल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे महागडे असल्याने आणि या कॅमेऱ्यामध्ये आपली चोरी टिपली जाऊ नये. यासाठी चोरट्यांनी कॅमेऱ्यांना लक्ष केल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसात ॲडव्होकेट यादगिरी यांच्या बंगल्या समोरील तसेच येथील माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्या विरंगुळा हॉटेल वरील तसेच येथील कोर्टी रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय मधील तीन कॅमेरे चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्या रंगोळी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी करून दीड लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास करण्याची घटना घडली आहे. यामुळे चोरी करण्याअगोदर चोरट्यांची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडत असल्याचे दिसत आहे. चोरी करताना काही न सापडल्यास सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेण्यात चोरटे धन्यता मानत असल्याचे दिसत आहे. यामुळे पंढरपूर शहरातील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याकामी पंढरपूर शहर पोलिसांवरील जबाबदारी आणखी वाढत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *