Uncategorized ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे इव्हीएम विरोधात 17 जून रोजी घंटानाद आंदोलन;

‘ईव्हीएम हटाव देश बचावचा’ नारा देत १७ जूनला जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालयांसमोर होणाआंदोलन .

जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांमध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मत मोजणी यांमध्ये तफावत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बोलताना सांगितले. या बाबत निवडणूक आयोगाकडे आठ दिवसापूर्वी तक्रार करून देखील याबाबत निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ चा नारा भारिप बहुजन आघाडीने दिला आहे. यास पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीही या आंदोलनात सहभागी होणार असून ईव्हीएम च्या वापरा विरोधात राज्यभर घंटानाद आंदोलन केले जाईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला आहे.

येत्या १७ जून रोजी राज्यभरातील जिल्हा आणि तालुका तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावे, अशी मागणी यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केली. भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम वापराचा अट्टाहास करून पारदर्शक निवडणूक घेतल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करणे हा अपराध असून हे काम निवडणूक आयोगाने केल्याचा आरोप करीत देशभरात ईव्हीएम विरोधात असंतोष वाढत असून या लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामुळे जनताही आश्चर्यचकीत झाली असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *