Uncategorized ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनातर्फे श्री विठ्ठल अभियांत्रिकीत येत्या रविवारी ऑनलाईन प्रवेशाबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

पदवी अभियांत्रिकीसाठी रजिस्ट्रेशन करण्याची मुदत दि.२१ जूनपर्यंतच.

जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर

महाराष्ट्र शासनातर्फे गोपाळपूर (ता.पंढरपूर)येथील श्री विठ्ठल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये येत्या रविवारी दि. २३ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता पदवी व पदविका इंजिनिअरींग तसेच पदवी व पदविका फार्मसीच्या ‘सेतू सुविधा केंद्र’ तसेच प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचे मोफत मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत सेतू सुविधा केंद्राची (केंद्र क्र.६२२०) स्वेरीमध्ये स्थापना केली असून दि. ७ जून २०१९ पासून सर्व विभागासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु झाली आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या या नोंदणीची अंतिम मुदत शुक्रवार दि.२१ जून पर्यंत असल्याचे शासनातर्फे प्रसिद्ध केले आहे. तरी बारावी सायन्स मधून उत्तीर्ण असणाऱ्या आणि अभियांत्रिकी व फार्मसी विभागासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन देखील प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे यांनी केले आहे. दिलेल्या मुदतीमध्ये रजिस्ट्रेशन न केल्यास शासनातर्फे असणारी कोणतीही शिष्यवृत्ती मिळणार नाही. यासाठी जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर जावून प्रवेश अर्जाची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चिती करून घ्यावी. आपला युजर नेम आणि पासवर्ड कोणालाही देवू नका त्यामुळे फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अभियांत्रिकीची पूर्व माहिती मिळावी व वेळ ही वाचावा या हेतूने स्वेरीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी [F.Y.B. Tech.] चे मोफत सराव वर्ग सोमवार दि.१७ जून पासून सुरु झालेले आहेत याचा फायदा इच्छुकांनी घ्यावा. बदललेल्या नियमांमुळे विद्यार्थी व पालकांची प्रवेश घेण्यासाठी गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी विद्यार्थी व पालकांचा होणारा संभ्रम व येणारी अडचण लक्षात घेवून इंजिनिअरींग आणि फार्मसीच्या पदवी व पदविकेचे प्रवेश अर्ज कसे भरावेत,इंजिनिअरिंग मधील ब्रॅंचेसची निवड कशी करायची? चॉईस कोड, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंडस) याबाबत विद्यार्थी व पालकांना येत्या रविवारी दि.२३ जून २०१९ रोजी सकाळी ९.३० वा. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातच मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा’ असे आवाहन देखील केले आहे.या मेळाव्याला उपस्थित राहणारे विद्यार्थी व पालकासाठी पंढरपूरमधील जुने एसटी स्टॅंड ते स्वेरी कॉलेजपर्यंत सकाळी ९ पासून मोफत बससेवेची सोय केलेली आहे. अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे (९५४५५५३७७४),स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८) प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) व प्रा. पी. के. भुसे (९२८४०७७०८०) तसेच टोल फ्री क्रमांक १८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *