Uncategorized

जैनवाडी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबीर संपन्न

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर। आज दिनांक ९/८/२०२० रोजी जैनवाडी येथे दिपकदादा पवार मित्रमंडळ व ग्रामपंचायत जैनवाडी यांचेवतीने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत भविष्यातील शैक्षणिक वाटचाली संदर्भातील इच्छा व्यक्त केल्या. त्याअनुषंगाने मा.प्रा.शशीकांत देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर
अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी छंद व कला जोपासुन व्यक्तीमत्व समृद्ध करावे.
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यासाबरोबरच सर्वांगिण ज्ञान महत्त्वाचे आहे तसेच मार्क व गुण यातील फरक समजुन फक्त मार्क्सच्या पाठीमागे न धावता गुणवंत व्हा कुटुंबाचे व गावाचे नाव उज्वल करा अशा सदीच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त
धनश्री प्रशांत साळवे ९३.६० %
द्वितीय क्रमांक
आर्यन कमलाकर माने ९१.६० %
तृतीय क्रमांक
विश्वजीत अनील नांद्रे ८६ %
चतुर्थ क्रमांक
वृषाली विलास गोफणे ८५.८० % व साक्षी विजय मेंढेगिरी ८५ %
या विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसोबत दहावी उत्तीर्ण ३५ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष
ॲड.दिपक पवार, सरपंच हणमंत सोनवले,विक्रीकर अधिकारी योगेश साळवे,तंटामुक्त समिती अध्यक्ष हसुरे सर,विष्णु गोफणे,धनजंय लिंगडे सर,मोहन माने,प्रशांत साळवे,विलास गोफणे,लोखंडे गुरुजी,बंडु पवार,सुनिल साळवे,रोहीत मेंढेगिरी,उत्तम लिंगडे,रतन मदने,सुहास पवार ,सत्यवान पवार,अक्षय कोळी,गणपत दासरे व पालक उपस्थित होते…
प्रास्तविक व सुत्रसंचालन राजकुमार जमदाडे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *