Uncategorized

पंढरपूरकडे काँग्रेसचे साफ दुर्लक्ष…

दमदार स्थानिक नेताच उरला नसल्यामुळे हे संकट लक्षात आणून देणार कोण?

जन संवाद वेब न्यूज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)


पंढरपूर। शहर आणि तालुक्यात कोरोनाने हैराण केले होते. त्यातून कसेबसे सावरत मागील सात महिन्यापासून जीवन जगणे सुरू होते. त्यामध्ये अधिक भर म्हणून अचानक आलेल्या महापुराने अर्ध्या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मान आणि भीमा नदीकाठचा भागातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन येथील जनता अक्षरशः हतबल झाली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते सक्षम असल्याने त्यांनी आपापल्या परीने आपल्या नेत्यांना इथपर्यंत आणून अडचणीत आलेल्या लोकांना किमान दिलासा दिला आहे. परंतु काँग्रेस पक्षात आता स्थानिक दमदार नेताच उरला नसल्यामुळे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत कांग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी भाजप मध्ये तर आ. भारत भालके यांनी विधानसभा निवडनूकीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. या दोन कांग्रेसचे दमदार नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे आता नेताच उरला नाही.
कांग्रेसला मानणारा गोरगरीब वर्ग अजूनही आहे. परंतु त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कोणीही नेताच उरला नसल्याने आता आता आहे तो वर्गही इकडेतिकडे जाण्याची तयारीत आहे. त्यांना अवरण्यासाठी कोणतेही सक्षम नेत्रुत्व नाही यामुळे या कांग्रेसला फार मागे पडण्याची वेळ आली आहे.
सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना व्यक्तीशः मानणारे काही बोटावर मोजणारे पदाधिकारी आहेत. त्यांचा संपर्क मात्र येथील जनतेशी काडीमात्र नसून केवळ सोलापूर जाणे सुशीलकुमार शिंदे आणि आ प्रणिती शिंदे यांची भेट एवढ्या वरच त्यांना मिळालेल्या पदाचा उपयोग केला जात आहे. कोणते तरी एखादे निषेध पत्रक काढून सोशल मीडियावर आपली प्रसिद्धी देण्यातच पदाधिकारी मोठं समाधान मिळवीत आहेत. त्या आंदोलनात आपला पक्ष किती मोठा आणि आपल्या त्या निषेध आणि आंदोलन ठिकाणी कितीकार्यकर्ते उपस्थित आहेत ,याचा कोणताही विचार या कायम बिझी असल्याचा आव आणणाऱ्या पदाधिकारी याना मात्र उरला नाही. ज्यांना मोठी पदे आहेत. त्यांनी किती पक्ष वाढविला याचा घेणारा कोणी जिल्हास्तरावर दिसत नसल्यामुळे पंढरपूर कांग्रेस ची मरगळ कधी दूर होणार हा प्रश्न मात्र निष्ठावन्त कार्यकर्त्यांना पडला असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली समशा नेमकी कोणाकडे मांडायची हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे आ प्रणिती शिंदे यांनी तर विचारात घेऊन ही परिस्थिती सावरण्यासाठी त्यांच्याकडे नेहमी येत असलेल्या येथील जबाबदार पदाधिकारी यांना विचारला पाहिजे. युवकांची फळी पूर्वी जी काम करीत होती. त्यामध्ये सध्या मरगळ आली असून ती पूर्ववत होण्यासाठी फार मोठी शक्ती पणाला लावावी लागणार आहे हे मात्र सध्याच्या ढासळलेल्या परिस्थितीवर दिसून येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *