Uncategorized

सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप

पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने अनेकांनी मानले आभार

जन संवाद वेब न्यूज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)


पंढरपूर। परतीच्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेलेली आहे व घरात जे धान्य शिल्लक होते ते देखील महापूराच्या पाण्यामुळे खराब झालेले आहे. याची दखल घेवून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी या नदीकाठच्या पुरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केलेले असून आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून नदीकाठच्या पुरग्रस्त नागरिकांना किराणा मालाच्या किटचे वाटप सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ या ठिकाणी करण्यात आला. पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्यामुळे अनेकांतून सुशिलकुमार शिंदे साहेबांचे आभार मानण्यात येत आहेत.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष नवनाथ आरे, संदिप गायकवाड, सुधाकर मासाळ, गोरख माने, सिताराम पळसे, दिपक गोरे, रोहित गवळी, दिनेश कोळी, आकाश गुरव, दत्तात्रय माने, सोमनाथ आरे, संतोष कुंभार आदि युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.सुशिलकुमार शिंदेसाहेब हे नेहमीच या भागातील शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आता महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी नदीकाठच्या नुकसानग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात येत आहे व लवकरच तपकिरी शेटफळ व चिंचुब या गावातील सर्व नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविली जाणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.
चौकट-
सुशिलकुमार शिंदेसाहेबांनी जपले पंढरपूरचे ऋणानुबंध
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देत असतात. सुशिलकुमार शिंदे साहेबांचे पंढरपूरशी एक वेगळे नाते जोडलेले आहे. ते ऋणानुबंध जपण्याचे काम आजपर्यंत साहेबांनी केलेले आहे व अडचणीत आलेल्या सर्वांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे साहेब सदैव कटिबध्द आहेत अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *