Uncategorized

अरिहंत पब्लिक स्कूल चा 45 वा वर्धापन दिन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर। रविवार दिनांक 25 -10- 2020 रोजी अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये वर्धापनदिन संपन्न झाला यानिमित्ताने प्रशालेचे माजी विद्यार्थी तेजस गुंडेवार
(एमबीबीएस, एस एम अँन्ड एम सी एच.)
ऑल इंडिया रँक 10 वा NEET आणि महाराष्ट्रात पहिला.
2) अभयसिंह बाळासाहेब देशमुख (इंडियन कॉर्पोरेट law सर्व्हिसेस 151 रँक 2019)

हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते देशभरामध्ये शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याठिकाणी करण्यात आला 45 वर्षापूर्वी मॉडर्न एजुकेशन सोसायटीने इंग्रजी माध्यमाची शाळा पंढरपुरात व तालुक्यात सर्वप्रथम सुरू केल्याने या माध्यमातील शिक्षणाची महत्त्वाची संधी परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाली असे उडगार मनोगतात पाहुण्यांनी व्यक्त केले. ऑनलाइन शिक्षणासंदर्भात पंढरपूरात सर्वप्रथम शिक्षण देणारी शाळा म्हणून या संस्थेचे संस्थेने बाजी मारली आहे.सध्याच्या अडचणीच्या काळात ही संस्था खंबीरपणे उभी आहे सर्व विद्यार्थी व पालक प्रशाले संदर्भात समाधानी आहेत हीच खरी ऊर्जा आहे.
तसेच SOF न्यू दिल्ली तर्फे सोलापूर जिल्ह्यातील गणित विषयाचे बेस्ट टीचर पारितोषिक मिळाल्याबद्दल सौ स्वप्ना दाते यांचा सत्कार करण्यात आला. सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला याचे प्रक्षेपण फेसबुक फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी यामध्ये अध्यक्ष माननीय डॉक्टर शितल शहा सचिव माननीय उज्वल दोशी तसेच माननीय डॉक्टर अशोक दोशी व मिलिंद शहा उपस्थित राहिले याचबरोबर माननीय सुप्रिया बहिरट मॅडम व माननीय पद्मा लोखंडे मॅडम यांच्या यांच्यासह शिक्षक प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा डंके यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *