Uncategorized

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर

जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना

जन संवाद वेब न्यूज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

    

पंढरपूर, दि. 19 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी  निवडणुक प्रक्रियेतील  नियुक्त अधिकारी, कर्मचारी व संबधित यंत्रणेने सोपविलेली जबाबदारी  काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण  सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी  तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, निवडणुक नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, निवडणुक विभागाचे राहुल शिंदे तसेच नियुक्त निवडणुक अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी ढोले म्हणाले,  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्यविषयक सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत सर्व  निवडणुक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडावयाची आहे. मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.    पुरुष मतदार व स्त्री मतदार तसेच दिव्यांग यांच्यासाठी तीन स्वतंत्र्य रांगा व दोन मतदारामधील सामाजिक अंतर 6 फुटाचे  ठेवावे. यासाठी गोल वर्तुळे चिन्हांकित करावीत.  मतदान केंद्रापासूण 200 मीटरचे अंतर चुना फक्की पावडरने चिन्हांकित  करावे. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत प्रचार साहित्य असल्यास ते काढून टाकावे. मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा चिन्ह असल्यास ते काढून टाकावे अथवा झाकून टाकावे. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतदार पसंती क्रमांक अंकात लिहावयाचा आहे. ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे.  भारतीय निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार  निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा  हा पर्याय वगळण्यात आला असल्याचे श्री.ढोले यांनी सांगितले

निवडणुक नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य योग्य असल्याची खात्री करुन घ्यावी. संबंधित कर्मचाऱ्यांनी साहित्य घेवून नेमून दिलेल्या वाहनांव्दारे पोलीस कर्मचाऱ्यासह  30 नोव्हेबर 2020 रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे. निवडणुक कामाजातील अधिकारी व कर्मचारी यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोपतरी काळजी घेण्यासाठी, प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर, स्वच्छ पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात यावी. तसेच सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. शहरीभागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण नगरपालिकेने तर ग्रामीण भागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने करुन घ्यावे, अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *