Uncategorized

‘विठ्ठल ‘च्या सभासदांचे उद्योगपती अभिजित पाटलांना साकडे

निवडणुका जवळ आल्यामुळे हालचालींना वेग वाढला

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)


पंढरपूर:प्रतिनिधी- विठ्ठल सहकारी साखर कारखाना पूर्वी प्रगतीपथावर असल्यामुळे सभासद समाधानी होते, परंतु सध्या हाच कारखाना अधोगतिकडे वाटचाल करीत असल्यामुळे पर्यायाने सभासद आणि कामगार यांचीही अधोगतिकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे या कारखान्याचे सभासद चांगल्या सक्षम संचालक मंडळाची अपेक्षा करीत अभिजीत आबा पाटील चालवीत असलेल्या कारखान्याची प्रगती पाहून अनेक सभासद भेटून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह करीत आहेत, त्यामुळे कारखाना आणि सभासद यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी यापुढं लक्ष घालावे अशी मागणी तीन साखर कारखाने चांगल्या पद्धतीने चालवीत असलेले चेअरमन अभिजित पाटील यांच्याकडे केली जाऊ लागली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामध्ये अनेक शेतकरी अडचणीत आले होते. त्यांना जाऊन विचारपूस करून मदतही केली आहे. अनेक गावांत जाऊन दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न केला आहे ,याचीच जाण ठेऊन अनेक विठ्ठल चे सभासद आगामी संचालक मंडळ निवडणुकीत सहभागी व्हावे यासाठी दररोज पाटील यांना भेटून विनंती करीत आहेत.
अभिजित पाटील यांनी बाहेरच्या जिल्ह्यात साखर कारखाने चालवूनही ऊस उत्पादक आणि कामगार यांची देणी योग्य वेळी अदा केली आहेत .त्यामुळे त्यांच्या काम करण्याची पद्धत आणि संस्था चालवीत असताना घेत असलेली काळजी यावर विश्वास ठेवून आता ,तालुक्यातील अडचणीत आलेल्या कारखान्याचेही नेतृत्व करावे अशी मोठया प्रमाणात सभासदातून मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करून तालुक्यातील संस्था आणि सभासद यांना गतवैभव प्राप्त करण्यासाठी अभिजित पाटील मोठया ताकतीने आगामी निवडणुकीत उतरले पाहिजे यासाठी मोठया हालचाली सुरू झाल्या आहेत.परंतु ही विठ्ठल च्या सभासद बंधूनी केलेली मागणी चेअरमन काय भूमिका घेणार याकडे कामगार वर्गासह सभासद यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *