Uncategorized

गावच्या गरजुंना दिला मदतीचा आधार…

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(दादासाहेब कदम)


पंढरपूर: आतापर्यंत समाजाने खूप काही दिल्यानंतर आत्ता आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो. याच सूत्रानुसार सामाजिक कार्य सुरू असून कोरोनाच्या काळातही
गोरगरिबांना आधार देण्याचे कार्य केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे ही जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने या गावचा भौतिक, सामाजिक, शैक्षणिक विकास व्हावा हा आपला मानस आहे. त्यादृष्टीने विकास प्रतिष्ठान स्थापन करून विविध विकास कामे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यामध्ये येथील ग्रामस्वच्छता अभियानातील शौचालय उभारणी उपक्रमास पाठबळ देऊन अनेक गरीब कुटुंबांना शौचालय उभारण्यासाठी मदत तर केलीच त्याच बरोबर या अभियानाची जनजागृती चळवळसुद्धा उभारली. यातून गावच्या स्वच्छतेला उल्लेखनीय हातभर मिळाला.
गावच्या विकासासाठी त्या गावातील शैक्षणिक क्षेत्र विकसित असावे लागते. त्यासाठी पुढाकार घेऊन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांसाठी सुमारे पंधरा लाख रुपये निधी मिळून नूतनीकरण केले. शाळेसाठी रंग काम करून संरक्षण भिंत उभारली, विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा म्हणून संगणक व प्रोजेक्टर देऊन वर्गखोल्या डिजिटल करण्याची जबाबदारी पार पडली. यातून शाळेचा भौतिक विकास झालाच परंतु गुणवत्तावाढीसाठी मदतच झाली. त्याचप्रमाणे येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयासाठी दीड लाख रुपये किमतीचा पिण्याच्या पाण्याचा आरो फिल्टर, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुमारे 50 बँच, विद्यार्थ्यांसाठी सुमारे 50 हजार रुपयेची स्पर्धा परीक्षा पुस्तके, तसेच संगणक संच भेट देऊन याही शाळेच्या विकासामध्ये भर टाकली.
गावातील शेतकऱ्यांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देऊन जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग नोंदवत येथील आष्टी तलावामधील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी सहकार्य केले.
भूमापन क्षेत्रामध्ये नोकरीस असल्याने कामाच्या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले या उपक्रमांची दखल घेऊन शासनाने वेळोवेळी सन्मानही केला. तर परिसरातील सामान्य जनतेचे असणारे प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न केले. यामध्ये गोरगरिबांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी मदत करण्याची भूमिका बजावली. तर कोरोनच्या काळामध्ये गावातील गरजूंना धान्य वाटप करून कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आधार दिला. तसेच या कालावधीत शासनाकडून दिलेली अतिरिक्त जबाबदारी म्हणजे पुणे येथे पुरवठा समन्वयक कार्य करताना तेथील अनेक गरजूंना आधार देण्याची कार्य केले. तसेच गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांनी व्यक्त केली असता एक बोअर ही स्वखर्चाने पाडून
दिली. तर गावातील तरुणाईसाठी भव्य क्रिडांगण तयार करण्याचे काम सुरु आहे.
एकूणच कोरोना कालावधी पूर्वी, कोरोना कालावधीत गरजू लोकांसाठी सामाजिक कार्य केले असून पुढील कालावधीत ही सर्वांच्या सहकार्याने समाजाच्या व गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणार आहे.
– शिवाजी भोसले, (रोपळे ता.पंढरपूर
उपसंचलक, भूमिअभिलेख पुणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *