ब्रेकिंग न्यूज

अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १लक्ष रू. दिली देणगी

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर/ प्रभू श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात पंढरपूर येथील अभिजीत पाटील यांनी सहभाग नोंदवून एक लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.

सध्या श्रीराम जन्मभूमि मंदिराचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून तीन वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. अतिभव्य असा या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट माध्यमातून भाविकांसाठी निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे.

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले युवा नेते अभिजीत पाटील यांनी देखील या अभियानामध्ये सहभागी होत सुमारे एक लक्ष रुपयांचा निधी तात्काळ अर्पण केला आहे. “भव्य अशा ऐतिहासिक कार्यात आपणही खारीचा वाटा उचलून पावन व्हावे, तसेच पंढरपूरचा एक सामान्य नागरिक म्हणून सर्व पंढरपूरवासियांच्या वतीने माझा भाव श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी या अभियानात सहभागी होत आहे.” अशी भावना असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमर पाटील, श्री. राजेश दंडे सर, श्री. काशिनाथ थिटे श्री. राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर येथील नागरिकांच्या वतीने श्री. अभिजीत पाटील यांच्या या कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *