Uncategorized

पंढरपूरच्या भागातही अवताडे गटाची जोरदार मुसंडी

सतरा गावातून जवळपास 40 ग्रामपंचायत सदस्य झाले हक्काचे तयार

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या दामाजी परिवाराचे नेते समाधानदादा अवताडे यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी फक्त मतदार संघातील गावात आपले स्वतंत्र उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उतरविले होते. यामध्ये याच भागातील प्रस्थापित नेत्यासमोर गटाचे आव्हान देत जवळपास40 ग्रामपंचायत सदस्य विजयी करून हक्काची ठिकाण तयार करण्यात मोठे यश मिळविले आहे.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील22 गावांपैकी17 गावातील या निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यामध्ये त्यामध्ये जवळपास40 उमेदवार विजयी तर अनेक उमेदवार थोड्या फार फरकाने पराभूत झाले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांना या भागातील लोकांना संपर्क साठी बरीच ओढाताण झाली होती. ती अडचण लक्षात घेता हक्काची नेतेमंडळी तयार करण्यासाठी जी भूमिका पार पडली आहे, त्यामध्ये बरेच यश मिळाले आहे. मंगळवेढा भागात आपले बस्थान एक नंबर वरती ठेवण्यात त्यांना मागील अनेकदा यश मिळाले असुन या भागातही आपले बस्थान बसविण्यासाठी चांगलीच तयारी ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *