Uncategorized

घरगुती वीज बील माफीसाठी पंढरपुरात मनसेचे आंदोलन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर – घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली.
पंढरपुरात ही आंदोलनाचे पडसाद उमटले.
येथील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत, वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी कोरोना काळातील थकीत वीज बील वसुलीसाठी तगादा लावला आहे.
त्यातच राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही वीज बिल भरा अन्यथा वीज तोडणीच्या कारवाईला सामोरे जा असे स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्या नंतर आज वीज ग्राहकांनी ही तीव्र संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी व ग्राहकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावून आंदोलन केले.
निवेदन घेण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व वीज वितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर उपस्थित अधिकार्याने निवेदन स्विकारले. यावेळी आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, जिल्हा संघटक सागर बडवे, शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी, शुभम धोत्रे,प्रथमेश धुमाळ आदींसह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *