Uncategorized

आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

१५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत दर्लिंग युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. प्रस्थापितांच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून, येथील युवक वर्गाने इतिहास घडविला आहे. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या निवडणुकीत , येथील युवावर्गाने नवा अध्याय रचला आहे .दर्लिंग युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून येथील १५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत , प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे . या पॅनलचे प्रमुख दत्तानाना सावंत, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन शिंदे , शिवाजी भोसले आणि सुजित शिंदे यांनी जोरदार फिल्डिंग लावून मोठा विजय मिळविला आहे .या निवडणुकीत ११ पैकी ७ जागा जिंकून आंबे ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली आहे.

आंबे ग्रामपंचायतीवर यापूर्वी काळे परिचारक गटाची सत्ता होती . गेल्या १५ वर्षापासून एकहाती सत्ता उपभोगणाऱ्या या गटास दर्लिंग युवा ग्रामविकास पॅनल कडून मात देण्यात आली आहे . या पॅनलमधील अशोक मुरलीधर शिंदे ,श्रीरंग विठोबा कोळी , निषाल बापू शिंदे , शोभा सदाशिव खिलारे, प्राजक्ता सुशील सावंत, गणेश मारुती कांबळे आणि कुसुम महादेव कांबळे हे ७ तरुण तुर्क उमेदवार विजयी झाले आहेत. युवा वर्गाने उभारलेल्या या पॅनलमधील सर्वच विजयी उमेदवार ३५ वर्षाच्या आतील असल्यामुळे , ही ग्रामपंचायत राज्यात सर्वात तरुण ग्रामपंचायत ठरण्याची शक्यता आहे.

निवडणुकीपूर्वीच आंबे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू होत्या. सत्ताधारी गटात केवळ १ जागेची मागणी करण्यात आली होती. परंतु युवा वर्गाची मागणी धुडकावून लावणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आंबे येथील नागरिकांनी जागेवर आणले असल्याची प्रतिक्रिया सुजित शिंदे यांनी दिली आहे .
राजकारणाचा लवलेश नसलेल्या येथील युवा वर्गावर विश्वास टाकून ग्रामपंचायतीची सत्ता हाती देणाऱ्या येथील नागरिकांचे , युवा पॅनलकडून आभार मानले जात आहे.

आंबे ग्रामपंचायतीवर परिवर्तनाचा झेंडा फडकविण्यात येथील दिलीप कोळी , सखाराम शिंदे, तानाजी शिंदे, नवनाथ शिंदे, नागनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब राजेंद्र शिंदे , अर्जुन कोळी , समाधान अंकुश शिंदे, विजय माळी , नाना शिंदे ,मनीष खिलारे , संभाजी कांबळे, बापू शेंडे , युवराज सावंत आदी युवकांचा मोठा सहभाग असल्याची माहिती येथील नागरिकांकडून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *