Uncategorized

सातारा -पंढरपूर एसटी बसवर दरोडा

चार अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर (प्रतिनिधी) सातारा – पंढरपूर एसटी बसवर दगडफेक करून दरोडेखोरांनी ताबा मिळवल्याची घटना पिलीव घाटात घडली. दरोड्याच्या उद्देशाने दहा ते बारा दरोडेखोरांनी ही दगडफेक केली.यामध्ये बस चालक ,एक मोटरसायकल चालक तसेच काही प्रवासी जखमी झाले . मंगळवारी रात्री ही घटना घडली असून, माळशिरस पोलिस ठाण्यात ठाण्यात याप्रकरणी ४ अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बसच्या बाबतीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिलीव घाटात घडलेल्या या घटनेमध्ये, एसटी बसचा चालक एक मोटरसायकलस्वार , आणि बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत .याचप्रमाणे बसचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातारा -पंढरपूर ही एसटी बस पिलीव घाटात असताना , १० ते १२ अज्ञात दरोडेखोरांनी बस आणि मोटरसायकल चालकावर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. मोटारसायकल चालक तसेच बसमधील काही प्रवासी आणि बस चालक जखमी झाला. यानंतर या दरोडेखोरांनी गाडी थांबवत बसवर ताबा मिळवला . एसटीतील प्रवाशांना मारहाण करण्यात आली. बसच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले . पंढरपूरकडून साताऱ्याकडे ही बस जात असताना ही घटना घडली. पंढरपूर- सातारा रस्ता दोन्ही बाजूनी बंद करण्यात आला. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडली आहे .दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माळशिरस आणि म्हसवड पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी रवाना झाले . दरोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी ये-जा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे .यावेळी एसटीवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलिसांकडून पंढरपूर सातारा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे . या प्रकरणी चार अज्ञात इसमांविरोधात भांदवि कलम ३९४, ४२७ आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *