Uncategorized

भाळवणी गट बनला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

 

पंढरपूर/ ग्रामपंचायत निवडणुक निकालातुन भाळवणी गट हा राष्ट्रवादी पार्टीचाच बालेकिल्ला बनल्याचे दिसुन आले.
गटातील १० गावामध्ये निवडणुक लागली होती.
त्यापैकी जैनवाडी हे गाव बिनविरोध करुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.दिपकदादा पवार यांनी विजयी सलामी दिली होती.

भाळवणी गटामध्ये एकुण १०८ सदस्यसंख्या असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ४३,परिचारक गट ३७ ,काळे गट २३,तर सेना २ , अपक्ष व स्थानिक गट ३ असे एकुण बलाबल आहे.
जवळपास निम्म्या जागेवरती विजय मिळवत प्रस्थापित नेत्यांना हादरे देण्यात राष्ट्रवादीची नव्या दमाची तरुण मंडळी यशस्वी झाली आहे.

परिचारकांच्या भाजप प्रवेशाने गटातील व तालुक्यातील राष्ट्रवादी सपंल्याचे चित्र होते.
त्यानंतर ॲड.दिपक दामोदर पवार यांची तालुकाध्यक्ष म्हणुन निवड झालेनंतर गावोगावी युवकांची फळी उभी करण्यात ते यशस्वी झाले.त्यामुळेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काळे व परीचारक हे मातब्बर नेते एकत्र असताना देखील भाळवणी गटातुन व तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतदान झाले.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरुणांची ही भक्कम फळी निर्णायक ठरेल हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *