Uncategorized

पंढरपूर भागांतून समाधान अवताडे यांचे आकर्षण वाढले

  • पोट निवडणुकीतील विकासप्रिय उमेदवार म्हणून निमंत्रणे वाढली
  • दिलेल्या निमंत्रनाचा सन्मान राखत चेअरमन अवताडे यांचीही आवर्जून उपस्थिती
  • ग्रामपंचायत निवडणूकित पंढरपूर भागातही केले स्वतंत्र अस्थीत्व

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर:- प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून दोनवेळा चांगल्याप्रकारे मतदान घेत पराभूत झालेले उमेदवार चेअरमन आणि उद्योजक समाधान अवताडे यांच्यातील विकासाची तळमळ आणि ध्यास असलेल्या या उमेदवारास यापुढील काळात संधी द्यायची, या उद्धेशाने पंढरपूर भागातील जनतेनेही आता मनावर घेतले आहे. त्यासाठी आपल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण अवताडे यांना देण्याचे प्रमाण खूपच वाढले असून त्या निमंत्राचा आदराने स्वीकार करीत अवताडे यांनीही आवर्जून उपस्थित राहण्याचे प्रमाणही100 टक्के झाले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार मतदार संघात मंगळवेढा शहर आणि सर्वच ग्रामीण भाग असून, यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील22 गावांचा समावेश आहे. मागील दोनवेळा लढविलेल्या निवडणुकीत मंगळवेढा भागातील लोकांनी आपला उमेदवार म्हणून एक नंबर ने मतदान केले होते. परंतु पंढरपूर भागातून ते फारसे परिचित नसून त्यांच्यातील असलेली विकासाची दृष्टी याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांना या पंढरपूर भागातून फारच कमी मतदान झाले होते.
याबाबत पंढरपूर भागातील दर्दी लोकांनी अभ्यास केला असता मंगळवेढा भागातील लोकांवर जे प्रेम दाखविले जात आहे, त्याच पद्धतीचे प्रेम आपल्या पंढरपूर भागातील लोकांनाही मिळावे यासाठी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चेअरमन समाधान अवताडे यांच्या दामाजी परिवाराचे वतीने पंढरपूर भागातील 17 गावात स्वतंत्र उमेदवार उभे राहिले होते.तयामध्ये जवळपास40 ग्रामपंचायत सदस्य हे अवताडे यांना मानणारे विजयी झाले आहेत. तर बहुतावशी पराभूत उमेदवारही काही अल्पशा मताने पराभूत झाले आहेत.यामुळे विजयी असो अथवा पराभूत परंतु आपल्या हक्काची नेतेमंडळी गावोवाव निर्माण करण्यासाठी अवताडे याना मोठे यश मिळाले आहे.
मागील दोनवेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर भागातून जी मते मायनस होऊन पराभव झाला होता, तेवढी मते प्लस करून एक हक्काचा दामाजी परिवार तयार केला आहे.
आगामी पोट निवडणुकीतही अवताडे यांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घेतली तरी पंढरपूर भागातून आता त्यांना हक्काचे मतदार आणि योग्य नेतेमंडळी यांचा मोठा आधार मिळणार आहे.
ग्रामीण भागातील22 गावातून चांगली फळी तयार केली असून पंढरपूर शहरातील कार्यकर्त्यांची एक फळी गटअवताडे यांचा दामाजी परिवार मजबूत करण्यासाठी छुप्या पद्धतीने कार्यरत असून शहरातूनही बरेच सक्रिय कार्यकर्ते आतून कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थिती चा अभ्यास केला असता, पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून झालेले मायनस मतदान हे प्लस मध्ये आणून ठेवण्यात सध्या तरी दामाजी परिवार यशस्वी झाला आहे हे मात्र नक्की.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *