Uncategorized

कोरोनाचे वाढत्या प्रभावामुळे दामाजीची वार्षिक सभा स्थगित-: आवताडे

जन संवाद वेब न्यूज पोर्टल 
(आबासाहेब दुधाळे)
पंढरपूर:   प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव व त्यासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत दुरचित्रवाहिनीवरुन केलेले आवाहन व सध्याचा कोवीड-१९ चा वाढता प्रभाव यामुळे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची दि।२७/२/२०२१ रोजी बोलावण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण सभा  स्थगित करण्यात येत असलेचे संस्थेचे चेअरमन समाधान  आवताडे यांनी सांगीतले.
या अवाहनमध्ये ना ठाकरे त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी राजकिय, सामाजीक, धार्मीक कार्यक्रम,मिरवणुका, आंदोलन,सभा मोर्चे, यात्रांवर बंदी घालण्यात आली असलेचे नमुद करुन नियम न पाळणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.यामध्ये त्यांनी मास्क घाला, सुरक्षीत अंतर ठेवा, सùनीटायझरने हात वारंवार धुवा व कोरोनाची साखळी तोडणेस मदत करा असे आवाहन केले आहे। याशिवाय गरजेप्रमाणे बंधने घालण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेचे प्रकट केले आहे। आपल्या कारखान्याचे २८००० पेक्षा जास्त सभासद आहेत। सभेसाठी मोठया प्रमाणात गर्दी होवुन केवळ एकाद्या व्यक्तीमुळे कोरोनाचा प्रभाव मोठया प्रमाणात वाढणेची शक्यता नाकारता येत नाही  मुख्यमंत्र्यांचे अवाहनास प्रतिसाद व कोरोनाचे वाढते संकट विचारात घेता श्री संत दामाजी सह।साखर कारखान्याची दि।२७/२/२०२१ रोजी होणारी ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात येत असुन सभेची पुढील तारीख,वेळ व ठिकाण यथावकाश जाहिर करण्यात येईल असेही समाधान आवताउे यांनी सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *