Uncategorized

काँग्रेसने दिलेल्या पदाचा उपयोग पक्षवढीसाठीच करणार :- सुरवसे

शंकर सुरवसे यांच्या रूपाने पक्षाला मिळाला आक्रमक चेहरा

जन संवाद वेब न्युज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर:- प्रतिनिधी आपण यापूर्वी केलेली पक्ष कार्याची दखल घेऊन काँग्रेसच्या नेतेमंडळींनी माझी आता युवक काँग्रेसच्या जिल्ह्यातील जबाबदार पदावर निवड केली आहे. या पदाचा उपयोग आपण पक्षवढीसाठीच करणार असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांनी दिली आहे.
सुरवसे यांनी पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस, आणि शहराध्यक्ष पदावर काम करीत असताना समाजातील विविध प्रश्नासाठी विविध प्रकारची आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. या अनेक आंदोलनाच्या वेळी अनेक गुन्हेही स्वीकारले असून यापुढील काळातही समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देत असताना अजूनही कितीही गुन्हे दाखल झाले तरी तमा बाळगणाऱ् नसल्याचेही शंकर सुरवसे यांनी सांगितले.
पक्ष वाढीसाठी या भागातील सर्व जुने आणि नवीन कॉंग्रेस कार्यकर्ते यांना सामावून घेत एक विचाराने काम करून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यासाठी युवक, महिला, युवती, यांच्या ताकदीवर येणारी पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढून काँग्रेसचा झेंडा लावून दाखविणार असल्याचेही सुरवसे यांनी सांगितले.
पंढरपूर भागातील आलेल्या नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी पंढरपूर शहरात एक युवक काँग्रेसचे कार्यालय उघडणार असून या कार्यालयाच्या माध्यमातून बाहेरून आलेल्या काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांना याचा फायदा करून देणार असल्याचेही सुरवसे यांनी सांगितले आहे.
पूर्वी काँग्रेसमध्ये आ भालके, चेअरमन कल्याणराव काळे आदी सहकारातील नेतेमंडळी असल्यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात दिसत होते. परंतु आता त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे गळती लागली होती. याची उणीव भरून काढणारा एक आक्रमक चेहरा म्हणून शंकर सुरवसे यांना जिल्ह्याच्या यादीत स्थान दिले आहे. याची प्रचिती लवकरच दिसून येईल हे मात्र नक्की.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *