Uncategorized

शिंदेवाडी गावामध्ये स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

माढा: प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील शिंदेवाडी गावातील हिंदू समाजातील लोकांसाठी स्मशानभूमी उपलब्ध करण्यात यावी याचे निवेदन माढा तालुका काँग्रेस कमिटीचे मा.विभागाचे तालुका अध्यक्ष मा.तुकाराम (आण्णा )देवकुळे यांनी तहसिलदार यांना दिले असून निवेदनात म्हटले होते की वेळोवेळी निधी उपलब्ध होऊन देखील केवळ जागा उपलब्ध होत नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच वर्षापूर्वी पासून लांबणीवर पडला आहे.
शिंदेवाडी महसूल हद्दीत शासनाचा जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी कायम स्वरुपी स्मशानभूमी उभा करणे शक्य आहे.सबब या प्रकरणी आपण मंडल अधिकारी माढा यांचे मार्फत चौकशीचे आदेश देऊन मा.जिल्हा अधिकारी यांच्याकडे रीतसर प्रस्ताव पाठवून शासकीय जागा उपलब्ध असल्यास तो जागा शिंदेवाडी ग्रामपंचायत यांचे नावे वर्ग करणेबाबत विनंती करावी .सादर विषयी आपल्या कार्यालयीन आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन सादर करताना मा.जहीर मणेर ‘उपाध्यक्ष माढा तालुका काँग्रेस मा.तुकाराम (आण्णा )देवकुळे अध्यक्ष माढा तालुका काँग्रेस कमीटी मा. विभाग मा. सचिन खैरे पाटील अध्यक्ष माढा तालुका काँग्रेस सेवादल मा.रमेश रणदिवे उपाध्यक्ष माढा तालुका काँग्रेस सेवादल अँड सागर कन्हेरे समन्वयक सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस मा.दाजी जाधव उपाध्यक्ष माढा तालुका काँग्रेस कमीटी मा. विभाग मा.सुनिल शिंदे मा.नितीन ( काकासाहेब) सावंत मा.किशोर शिंदे मा. दत्ता शिंदे मा.नागेश देवकुळे व शिंदेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *