Uncategorized

निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा दिपक पवारांसाठी एकमुखी ठराव…

  • राष्ट्रवादीसह विठ्ठल परिवारात उभी फूट
  • विठ्ठलची निवडणूक आम्ही पावरसाहेबावर निष्ठा असणाऱ्यामधील तिसरी पिढी स्वतंत्रपणे लढणार

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर: प्रतिनिधी/आज विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तालुका अध्यक्ष बदलासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पक्ष अडचणींत असताना निष्ठेने काम करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व पदाधिका-यांनी तालुकाध्यक्षपदी दिपक पवार यांची पुनश्च निवड करून झालेला अन्याय दूर करावा तोपर्यंत कोणताही पदाधिकारी व कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात व प्रक्रियेत भाग घेणार नाही असा ठराव सर्वानुमते हात वर करून करण्यात आला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज दादा पाटील म्हणाले की आमच्या संयमाचा अंत पाहू नका याचे गंभीर परिणाम कट-कारस्थान करणाऱ्यांना भोगावे लागतील.जर या निवडीत दुरुस्ती झाली नाही तर प्रसंगी विधानसभा निवडणुकीत देखील मला मैदानात उतरावे लागेल.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की युवराज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवून यात नक्कीच दुरुस्ती करायला भाग पाडू कोणत्याही परिस्थितीत याबाबत तडजोड केली जाणार नाही व मागे हटणार नाही ज्या पद्धतीने तालुकाध्यक्ष पदावरून दिपक पवार यांना हटवले ही पद्धत अतिशय चुकीची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले म्हणाले की अडचणीच्या काळात कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून कोण अन्याय करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. आज जे लोक मी राष्ट्रवादीचा असे म्हणून घेतात ते सत्तेचा लाभ घेण्यासाठी आज पक्षाचा वापर करत आहेत व त्यासाठी त्यांना निष्ठावंत कार्यकर्ते अडचणीचे वाटत आहेत म्हणूनच असले कटकारस्थान रचले जात आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले, महिला तालुकाध्यक्ष अनिता पवार ,शहराध्यक्ष संगीता माने ,ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील ,ओबीसी च्या जिल्हाध्यक्ष साधना राऊत, प्रदेश सचिव अरुण आसबे, श्रीकांत शिंदे,शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते, युवक शहराध्यक्ष स्वप्निल जगताप,संजय घोडके, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण भोसले, सरचिटणीस धोंडीराम घोलप, उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, युवक अध्यक्ष संतोष चव्हाण,सरचिटणीस औदुंबर चव्हाण,किसान सेल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक सरचिटणीस गिरीष गंगनमले,किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मासाळ यांनी आपले विचार व्यक्त करत दिपक पवार यांना समर्थन दिले..

यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अमरजीत गोडसे,युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, विद्यार्थ्यी राज्य उपाध्यक्ष संकेत ढवळे, शहर उपाध्यक्ष सुनील जाधव, शहरातील संघटक सचिन कदम, समीर मोरे, शहर सरचिटणीस शशिकांत शेख, जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक सेल मोहम्मद मुलाणी, शहर कार्याध्यक्ष रणजीत पाटील, महिला उपाध्यक्ष सुनिता शेजवळ, कार्याध्यक्ष सुनंदा उमाटे, तालुका कार्याध्यक्ष अनिल मोरे,तालुका संघटक चंद्रकांत जाधव,शिवाजी नाईकनवरे,धनाजी डोंगरे,शहर सचिव सचिन आदमिले, बालाजी कवडे,अनिल मोरे,पदवीधर तालुका उपाध्यक्ष समाधान चव्हाण,सचिन नकाते, सदाशिव भाटेकर,मधुकर मासाळ,सुदाम गायकवाड, रावसाहेब नागणे,हनुमंत बागल,तानाजी पांढरे, किशोर खरडकर,संजय बाबर, बहुसंख्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षासाठी मी जे कष्ट केले आहे ते सर्व वरिष्ठांना माहित आहे,त्यामुळे वरीष्ठ नेते माझ्यावर झालेला अन्याय नक्कीच दूर करतील असा मला विश्वास आहे.मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ,अजितदादा पवारसाहेब,जयंत पाटील साहेब यांना भेटून लवकरच दाद मागणार आहे-दीपक पवार

 

पक्षाच्या अडचणीच्या काळात आदरणीय पवार साहेबांच्यावरती प्रेम करणाऱ्या आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्र करून तालुक्यात पक्षाची फळी मजबूत करणाऱ्या कर्तव्यदक्ष तालुकाध्यक्षांच्या पाठीशी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहोत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *