Uncategorized

आवे नुतन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार संपन्न

जन संवाद वेब न्युज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर प्रतिनिधी/ नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आवे ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे ८ तर बबनदादा शिंदे गटाचे १ सदस्य निवडून आले होते.
आवे ग्रामपंचायतीचे राखिव महिला आरक्षण निघाले होते आणि २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच निवडी मध्ये त्या जागेवर संजय कांबळे यांची निवड करण्यात आली व उपसरपंच पदी कै मधुकर दिनकरन पाटील यांचे चिरंजीव राणु मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य महादेव करवर,संतोष कांबळे, शंकर शेंबडे,उमेश माने ,लक्ष्मण पाटील, युवराज कांबळे, पांडूरंग बनसोडे आदी सदस्य उपस्थित होते.
या झालेल्या निवडीबद्दल आवे गावचे समविचारी युवक दादासाहेब पाटील, गणेश दादा ननवरे, दिपक पिंजारी, नाथा कांबळे, मारुती भुसनर यांनी एकत्र येऊन सर्व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले.
यावेळी नुतन सरपंच यांनी सर्वाना बरोबर घेऊन गावाचा विकास करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास गावातील जेष्ठ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दिपक पिंजारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *