जन संवाद वेब न्युज पोर्टल
(आबासाहेब दुधाळे)
पंढरपूर(प्रतिनिधी) दोन साखर कारखाने चे चेअरमन या निवडणूकीला उभे राहिले आहेत. त्यांच्या कडे धनशक्ती आहे .तर माझ्या कडे जनशक्ती आहे. हे विरोधक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बीलावर बोलत नाहीत. कामगारांच्या थकीत वेतना बाबतीत बोलत नाहीत.
सिद्धापूर या गावातील नदीला कायम स्वरुपी पाणी रहावी म्हणून नदीवर बंधारा उभारण्यात यावा म्हणून आपण प्रयत्न करणार, या नदीतून वाळूचा उपसा होतो.त्यामुळे या गावातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत.अशीच परिस्थिती मंगळवेढ्यातील अनेक गावातील रस्त्याच्या बाबतीत आहे.
मतदार बंधूभगिनींनो तुम्ही मला एक वेळ विधानसभा मध्ये जाण्याची संधी द्या मी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला धनशक्ती आहे तर माझ्याकडे जनशक्ती आहे. मी जनतेच्या पाठबळावर, जनतेच्या प्रेमावर, मीही विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. माझे चिन्ह शिट्टी हे आहे. या शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे.” तुम्ही कोणाच्याही पालावर जावा परंतु मात्र शिट्टीला द्या असे आवाहन सौ शैलाताई गोडसे यांनी सिद्धापूर येथील प्रचार सभेत केले.