Uncategorized

आ.भालके यांना हॅट्रिकपर्यंत पोहचविणारे अनेक शिलेदार आवताडे यांच्या गळाला

  • सोमवारी ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार धक्का देणारे प्रवेश

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपुर: प्रतिनिधी/पंढरपुर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील कालवा आणि गोंधळ असणारा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे, अनेक उमेदवारांच्या गावभेटी दौरे आटोपून प्रचार फेरी सुरु आहेत. आता निवडणुकीतील एकदमच अंतिम टप्पा जवळ येत असतानाच भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार आणि प्रसार यंत्रणेमधून चक्क आ. भरतानाना भालके यांना ज्या लोकांनी गनिमी कावा वापरून तीन वेळा विजय मिळवीत हॅट्रिक पूर्ण केली, त्या लोकांनाच गळाला लावले असल्याची गोपनीय माहिती हाती आली असून येत्या सोमवार दि12 एप्रिल रोजी ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश करण्यात येणार आहे.
मागील तीनवेळा झालेल्या विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत आ भारताना भालके यांची निवडणूक रणनीती आखण्यासाठी एक मातब्बर लोकांची समिती होती. त्यामधून सर्व गनिमीकावे आणि भारतानानाचे नाव हृदयात स्थान निर्माण करायला लावत होते. परंतु ही निवडणूक केवळ सहानुभूतीच्या भरवशावर चालू आहे. या सहानुभूतीमुळे अनेकांना दुर लोटले गेल्याचे दिसून येत आहे.
पंढरपुर शहरातील सर्वपरिचित असणारा ग्रुप मागील तिन्ही निवडणुकीत आ. भारतनाना भालके यांच्यासाठी लढवैय्याची भूमिका घेत होता, परंतु वरिष्ठ पातळीवरून आलेल्या नेतेमंडळी मुळे या लढवैय्या कार्यकर्त्यांचा विसर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पडला होता. ही जाणीव समाधान आवताडे यांच्या प्रचार यंत्रणेला झाली असल्यामुळे आवताडे यांच्या प्रचारसाठी हा ग्रुप आता लवकरच सक्रिय होणार असून याचा फार मोठा परिणाम जाणवणार आहे.
आ. भारतानाना भालके ज्या लोकांना सन्मान देऊन आपल्यात सामील करून घेत होते त्याच लोकांना भगीरथ भालके यांनी चार हात लांब ठेऊन आपली निवडणूक चालू केली आहे. यामध्ये चांगली आणि नानांना हॅट्रिक मिळवून देणारी अनेकजण बाजूला गेली आहेत. ठराविक समाज आणि सहानुभूती यावरच ही निवडणूक भालके लढत आहेत.
सध्या निवडणूक अंतिम टप्यात आली असतानाही वरील बाब राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळीच्या लक्षात आली नाही,
समाधान आवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी परिचारक गटाने स्वीकारली असून आवताडे यांना निवडून आणणे यावरच परिचारक यांचे भावी राजकारण आणि पुढील दिशा ठरणार आहे.2009 ला झालेल्या चुकीच्या पध्दतीमुळे नगरपालिका, भीमा साखर कारखाना, दामाजी साखर कारखाना, आणि त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीतही सदस्य संख्या पूर्ण घटली होती, अशा अनेकवेळा नामुष्की घेण्याची वेळ परिचारक यांना आली होती. त्यानंतर त्यांना दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. वरील सर्व बाजू विचारात घेता, आवताडे हे विजयी होण्यासाठी परिचारक गटाने सर्वप्रकारची तयारी ठेवली असून अनेक भालके समर्थक गळाला लावले आहेत, ते नेमके कोण हे सोमवारी नक्की समजणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *