Uncategorized

उद्योजक अन सामाजिक कार्यकर्ते राजू खरे आवताडे यांच्या पाठीशी

आवताडे यांच्या मताधिक्यासाठी खरे समर्थकांची जोरदार फिल्डिंग

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपुर:-प्रतिनिधी/ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. समाधान आवताडे यांना भाजप महायुतीची उमेदवारी असल्यामुळें माजी मुख्यमंत्री अन विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे समजले जाणारे पंढरपूरचे रहिवासी आणि मुंबईतील उद्योजक राजू खरे यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदार संघातील आपल्या समर्थकांची ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी केली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारची सर्व जबाबदारी पार पाडली होती, पंढरपुर आणि मंगळवेढा भागात मतदानही मोठया प्रमाणात मिळवून दिले होते. त्यानंतर राजू खरे यांनी मोहोळ राखीव असलेल्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखविली होती परंतु महायुतीची जागा सेनेच्या वाट्याला गेल्यामुळे खरे यांनी निवडणूक लढवली नाही.
राजू खरे यांनी विद्यार्थी दशेत असल्यापासून आपले सामाजिक कार्य आणि चळवळ सुरू ठेवली आहे.त्यामुळे पंढरपुर आणि मंगळवेढा भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गोपाळपूर येथे मागील काही वर्षात एक फार्महाऊस बांधले असून त्याठिकाणी वास्तव्य असल्याने गोपाळपूर आणि परिसरातील अनेक गावातील लोकांचा कामानिमित्त दांडगा संपर्क आहे. पंढरपुर शहरातही अनेक भागात लहाणपणी पासूनच मोठा मित्रपरिवार तयार केलेला आहे. कायमच दानशूर वृत्ती असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदार संघात आहे. त्यामुळे ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी राजू खरे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आवताडे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *