ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत

विठ्ठल परिवाराचा ब्रेन हायजॅक…..!

  • ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच केला निवडणुक मॅनेजमेंट तज्ञ हिम्मतनाना आसबे यांनी भाजपमध्ये प्रवेश
  • उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी मिळाली मोठी पर्वणी
  • आसबे यांच्या भाजप प्रवेशाने पंढरपूर भागातील अनेक दिग्गज लोकांची मिळणार आवताडे यांना गुपचूप साथ

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

 

पंढरपुर : प्रतिनिधी/ पंढरपुर तालुक्यातील विठ्ठल परीवार मधील होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जी व्यूहरचना आखली जाते त्यामधील महत्वपुर्ण भूमिका बजावत विविध गनिमी काव्याचा वापर करून अनेक निवडणुकीत विजय संपादन करून दिलेल्या हिम्मतनाना आसबे आणि जितेंद्र डोंबे अजिंक आसबे यांच्यासह अनेकांनी चक्क ना. देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विठ्ठल परिवारातील ब्रेन हायजॅक केल्यामुळें उमेदवार समाधान आवताडे यांना पंढरपुर भागातील मतदानात वाढ होण्यासाठी नक्की फायदा होणार आहे.

पंढरपुर तालुक्याच्या राजकारणात दोन प्रमुख लढती प्रत्येक निवडणुकीत पहावयास मिळाले आहे. यामध्ये विठ्ठल परिवार विरुध्द पांडुरंग परिवार याच दोन परिवरमधून प्रत्येक निवडणूक लढविल्या जाण्याचीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून पहावयास मिळत आहे. यामध्ये विठ्ठल परिवारमधून निवडणूक नेमकी कशा पद्धतीने लढवली पाहिजे यामध्ये जी किंगमेकरची भूमिका पार पाडली जात होती यामध्ये पंढरपूर शहरातील निवडणूक मॅनेजमेंट तज्ञ तसेच लोकाभिमुख असे नेतृत्व म्हणून हिम्मत आसबे आणि त्यांच्या टीमचा समावेश असतो, यामुळे नेहमीच विठ्ठल परिवाराच्या बाजूने दिलेला कौल या पोटनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना नक्की मिळणार आहे.
एकहाती विठ्ठलवर सत्ता असतानाही स्व वसंतदादा काळे यांनी जे सत्तांतर घडवून आणले यामध्ये आसबे यांचीच भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. वसंतदादा काळे यांनी अचानकपणे जी विधासभा निवडणूक लढविली होती यामध्ये हिम्मत आसबे यांच्या कुशलतेने या निवणुकीतही विठ्ठल परिवराकडे मोठे मतदान खेचून घेतले होते, स्व वसंतराव काळे यांच्या प्रत्येक निवडणुकीतही आसबे यांनी महत्वपूर्ण भूमिका बाजावल्याचे दिसून आले आहे. दादांच्या निधनानंतर ही चेअरमन कल्याणराव काळे यांनाही मोलाची साथ दिली आहे. मागील काही वर्षांपूर्वी काळे आणि भालके आणि काळे यांच्यात राजकीय वितुष्ट होते त्यावेळी आ भालके यांनी आसबे यांची कौशल्य नीती पाहून आपल्या गटात सामील करून घेतले होते, त्यामुळे काळे आणि आसबे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
स्व भारतनाना भालके यांनाही विठ्ठल ची निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक यामध्येही महत्वपूर्ण नियोजन करून जवळपास सर्वच निवडणुकीत यश मिळवून दिले होते.
विठ्ठल परिवाराचा निवडणुकीतील ब्रेन म्हणून हिम्मतनाना आसबे तर पांडुरंग परिवाराचा निवडणुकीतील ब्रेन म्हणून उमेशराव परिचारक यांची आजवरच्या निवडणुकात ओळख आहे. परंतु वरील दोघांची मैत्री घट्ट होती, मैत्री असली तरी राजकारणात मात्र या मैत्रीमुळे कसलाही गोलमाल केला जात नव्हता .आता या निवडणुकीत मात्र आवताडे यांच्या या प्रचार आणि गनिमिकावा चालविण्यासाठी दोन्ही मित्र आणि निवडणूक मॅनेजमेंट तज्ञ एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत .त्याचा निवडणुक निकाल काय होईल हे सांगण्यासाठी कोणी जोतिषाची गरज उरली नाही.
आता निवडणूक अंतिम टप्यात येऊन ठेपली असताना हिम्मत आसबे आणि त्यांच्या टीमने जे आवताडे यांना समर्थन दिले आहे, ते नक्की चांगले यश मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार हे मात्र नक्की आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *