ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज   

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती       

जन संवाद वेब न्युज पोर्टल         

पंढरपूर, दि. 16 :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी  दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांचे दिनांक 13, 14 व 15 एप्रिल 2021 रोजी टपालाव्दारे मतदान घेण्यात आले. यामध्ये 3252 मतदारांनी टपाली मतदान केले आहे, मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद शंभरकर यांनी  दिली.

  252- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या तयारीच्या अनुषंगाने त्यांनी आज माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते.

श्री. शंभरकर म्हणाले, मतदारसंघात दिव्यांग मतदार 1785 आहेत. 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ  मतदार 13689 आहेत. यापैकी 3252 मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ज्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिक मतदारांनी टपाली मतदान केले नाही. त्यांना बुथवर जावून मतदान करता येणार आहे.  मतदारसंघात 1 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार  व 1 लाख 62 हजार 694 स्त्री मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत.  पोटनिवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रे असून, त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. यामध्ये 16 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या  प्रत्येक मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक केली आहे. तसेच 252 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग व्यवस्था करण्यात आली आली आहे.  तसेच 326 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती, श्री. शंभरकर यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या मतदारास शेवटच्या एक तासामध्ये कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करुन मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.मतदानासाठी 2620 आधिकारी-कर्मचारी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 550 पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच 1 हजार आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक केली असून, 1310 राखीव कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कर्मचाऱ्यांच्या सुररक्षिततेसाठी 90 हजार मास्क, 8 हजार 500 फेस शिल्ड, 4800 बॉटल सॅनिटायझर, 550 पल्स ऑक्सिमीटर, सोडियम हायपोरेट 2500 लिटर मतदान केंद्रावर पुरविण्यात येणार आहे.   मतमोजणी  दोन मे 2021 रोजी सकाळी 8.00 वाजलेपासून शासकीय धान्य गोदाम पंढरपूर, येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *