Uncategorized

यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

पंढरपूर/तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरातील यमाई तलाव परिसरात असलेल्या बुद्ध भूमीवर तथागतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी या बुद्धभूमिवर पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्ध विहाराची निर्मिती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला. आजच्या कोरोना महामारी च्या काळात मानवाला तारणारा एकमेव मार्ग म्हणजेच धम्म मार्ग होय. या धम्म मार्गाची ओळख करून देण्यासाठी सर्वांनी धम्म मार्गाचा स्वतः अवलंब करीत प्रसार करावा. असे आवाहन करण्यात आले. यावेळी सम्यक क्रांती मंचाचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, ब.स.पा जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, भीम ज्योत तरुण मंडळाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर वाघमारे, राजाभाऊ बंगाळे, मंचाचे सहसचिव स्वप्नील गायकवाड, राजन गायकवाड, निलेश सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *