Uncategorized

संतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

पंढरपूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूकीत अत्यल्प मतांच्या फरकाने पराभूत झालेले भगीरथ भालके पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचे चित्र आज पालिकेत पाहावयास मिळाले. पंढरपूर नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी संत पेठ विभागातील गौतम विद्यालय व गुजरात कॉलनी समोर सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी गाळ्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या गाळ्याच्या वाटपामध्ये पंढरपूर नगर परिषदेतील काही कर्मचारी आणि ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात फेरफार करत संबंधित गाळे स्वतःच्या व बगलबच्याच्या घशात घालण्याचे काम केले आहे. संबंधित निविदा ऑफलाइन पद्धतीने काढण्यात आली होतो, खरेतर सिलबंद निविदा अर्जदारांच्या समोर उघडायचे असताना पालिकेतील अधिकारी व संबंधित काही लोकांच्या आर्थिक व्यवहारातून कोणालाही पूर्वसूचना न देता, कोरोना कालावधीत निविदा उघडण्याचे काम पंढरपूर नगरपरिषदेने केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे. सिलबंद निविदा उघडताना एका कारकून दर्जाच्या कर्मचाऱ्यांनी काही लोकांशी आर्थिक संबंध जोडत निविदेत फेरफार केल्याचे सर्वसामान्या मधून बोलले जात होते. वरील झालेल्या प्रकाराचे पडसाद पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात उमटत होते. संतपेठ विभागातील लोकांनी पालिका कर्मचाऱ्याकडून व सक्रिय ठेकेदाराकडून वरील प्रकार केल्याचे भगीरथ भालके यांच्या कानावर घातले होते. याच गोष्टीचे निमित्त साधून भालके यांनी पंढरपूर नगरपरिषदेतील भालके गटातील नगरसेवक यांच्यासोबत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना वरील झालेल्या प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला व सोबत लेखी निवेदन देण्यात आले. या गोष्टीतून पंढरपुर नगर परिषदेत विरोधी गट नसल्याचे वातावरण काही दिवसांपूर्वी निर्माण झाले होते. परंतु संत पेठेतील गाळे प्रकरणामुळे पालिकेतील भगीरथ भालके समर्थक नगरसेवक व वार्ड पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे आज दिसून आले. या सक्रियतेने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली, ती म्हणजे येणाऱ्या पालिका निवडणुकीत भालके सक्रियतेने दिसून येतील. वार्ड पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीमध्ये भालके समर्थक नगरसेवक व कार्यकर्ते काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आज दिले गेलेले गाळे प्रकरणावरील निवेदन, संत पेठ विभागातील गाळे प्रकरणामुळे पंढरपूर नगर परिषदेतील विरोधी गट सक्रिय झाला असून भविष्यात पालिका निवडणुकीवर ही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पालिकेत भ्रष्टाचार होत असताना विरोधात बोलणारे लोक पंढरपूर नगरपरिषदेत नाहीत असेच चित्र पूर्वी होते, सध्या भालके यांच्या सक्रियतेने हे चित्र संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत आणि शहरातील भालके गटातील विद्यमान नगरसेवक आणि नगरसेवकाच्या स्पर्धेत वार्ड स्तरावर सक्रिय असणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये चैतन्य उत्पन्न झाल्याचे चित्र आज पंढरपूर परिषदेत निर्माण झाले आहे. कारण संत पेठेतील गाळे वाटपाचे का असेना, परंतु पालिका निवडणुकीच्या मुहूर्तावर भालके आणि कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे चित्र मात्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *