ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय

बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचे प्रतिपादन

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

हिंगोली/महाराष्ट्राला फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा तसेच संत परंपरा लाभल्याने राज्याला पुरोगामी अशी ओळख मिळाली आहे. परंतु, मराठवाड्यात आजही मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशकतेच्या मूल्यांना तिलांजली दिली जाते. आजही हिंगोलीत शोषित, पीडित , उपेक्षितांना कुत्सित मानसिकतेतून बघितले जाते. त्यामुळे समाजबांधवांना मुख्यप्रवाहात आणून शोषितांपासून ‘शासनकर्ती जमात’ बनवण्याचे उद्दिष्ट बहुजन समाज पार्टीचे आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी हिंगोलीत केले. संवाद यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रमातून कार्यकर्ते, पदाधिकार्यांना संबोधित करतांना त्यांनी भाजप तसेच महाविकास आघाडीच्या शोषित, पीडित विरोधातील मानसिकतेवर टीकास्त्र चढवले.

देशाला सामाजिक क्रांतीची दिशा देणाऱ्या पुरोगामी, पुढारलेल्या महाराष्ट्रात पीडित, शोषित, उपेक्षितांची आजही अवहेलना होते.भाजप,महाविकास आघाडी सरकार याला सर्वस्वी जबाबदार आहे. केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या राजकीय पक्षांकडून उपेक्षितांचा वापर केला जातो,असा आरोप अँड. ताजने यांनी केला. राज्यात २०१७ पासुन अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती वरील अत्याचारात वाढ झाली आहे. अँट्रॉसिटीच्या प्रमाणात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आहे, अशी संतप्त भावना देखील त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात मोठी सामाजिक क्रांती घडून आली आहे. असे असतानांही राज्यात मोठ्या प्रमाणात एससी,एसटी यांच्यावरील अत्याचारात वाढ होण्यास राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे अँड.ताजने म्हणाले.

अशात नाकर्ते राज्यकत्र्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. उपेक्षितांविरोधात होणार्या प्रत्येक अत्याचाराचा जाब बसपा विचारणार आहे. महाविकास आघाडी आणि विरोधातील भाजप हे आरक्षण तसेच शोषित,पीडितांविरोधी मानसिकतेचे आहे. त्यांना आगामी निवडणुकांमध्ये अद्दल घडवा, असे आवाहन अँड.ताजने यांनी यानिमित्ताने केले.

कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव दिगंबरराव ढोले, प्रदेश सचिव देवराव भगत, अविनाश वानखडे, प्रदेश कार्यालयीन सचिव प्रा.डॉ.अभिजित मनवर, जेष्ठ नेते रमेश भैय्या भिसे-पाटील, राहुल कोकरे, गोविंदराव भगत, मनिष कावळे, बबनराव बनसोड, जिल्हा अध्यक्ष प्रज्ञावंत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश दिपके, कोषाध्यक्ष वसंत पाईकराव, महासचिव राजेश जोंधळे, अनिल वाढवे, परमेश्वर लोखंडे तसेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

संवाद यात्रेमुळे राज्यातील वातावरण ‘बसपा’मय विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात संवाद यात्रेला बरेच प्रेम मिळाले. बसपाच्या सर्वसमावेशक, सर्वजन हितकारक विचारांनी मोठ्या प्रमाणात नागरिक प्रेरित झाले आहे. अनुसूचित जाती, जमाती , ओबीसी तसेच सर्व समाजाच्या समस्यांना योग्य विचारपीठ उपलब्ध करवून त्याचे निराकरण करण्यासाठी केवळ बसपाच पर्याय असल्याचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना म्हणाले. गावोगावी आणि खेड्यापाड्यावर संवाद यात्रेला बरेच प्रेम मिळाले आहे.प्रस्थांच्या अत्याचारांमुळे समाजापासुन नाळ तुटलेल्या उपेक्षितांना आता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हिंगोलीतील स्थानिक स्वराज संस्थेवर बसपाचा निळा झेंडा फडकवण्याचा निर्धार संवाद यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी केला आहे, असे ते म्हणाले. संवाद यात्रेमुळे राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून बसपाची लाट तयार झाली असल्याचे रैना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *