Uncategorized

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला बसपाचे समर्थन

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

मुंबई/ केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरीने लादलेल्या तिन्ही शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून राजधानी दिल्ली तसेच देशातील इतर भागात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उद्या, सोमवारी देशभरातील शेतकरी संघटनांनी या काळ्या कायद्यांविरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. बहुजन समाज पार्टीचे या बंदला पुर्ण समर्थन आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.बहन मायावती यांनी शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चे समर्थन केले आहे. केंद्र सरकारने हे काळे कायदे परत घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. अशात बसपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून भारत बंदचे समर्थन केले जाईल. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या लढ्यात अखेरपर्यंत बसपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

केंद्र सरकारने घाईगडबडीत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता लादलेले शेती सुधारणा कायद्यांबद्दल असहमत तसेच दु:खी शेतकरी हे कायदे मागे घेण्याची मागणी करीत गेल्या १० महिन्यांपासून संपूर्ण देशभरात तसेच दिल्लीतील आजूबाजूच्या राज्यात आंदोलन करीत आहे. या शांतीपूर्ण आंदोलनाला बसपाचा जाहीर पाठिंबा आहे.

देशाचा शेतकरी सुखी तरच देश खुश राहू शकतो.अशात शेतकऱ्यांची तसेच सर्वसमान्यांची जनभावना लक्षात घेत,शेतकर्यांबद्दल सहानभूती आणि संवेदनशीलता दाखवून केंद्राने हे कायदे मागे घ्यावे आणि योग्य सल्लामसलत करून शेतकरी आंदोलकांच्या सहमतीने नवीन कायदे आणून समस्येचे निराकरण करावे, अशी पक्षाची भूमिका आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *