Uncategorized

अकलूज येथे आधुनिक पध्दतीने  शेळी पालन व दुग्ध व्यवसाय कार्यशाळा    

जन संवाद वेब न्युज पोर्टल

पंढरपूर दि. (23):-   महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सोलापूर यांच्यामार्फत अकलूज ता.माळशिरस येथे दिनांक 28 डिसेंबर 2021 पासून आधुनिक पद्धतीने शेळी पालन, दुग्ध व्यवसाय यावर आधारित पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली  असल्याची माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व्दारा जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी दिली.

या कार्यशाळेत आधुनिक पद्धतीने शेळीपालन गिर गाय, दुग्ध व्यवसाय यामध्ये असणाऱ्या विविध उद्योग संधी  व नियोजन,  शेळ्यांची, कोंबड्यांची, दुधाळ जनावरांची निवड त्यांचे प्राथमिक उपचार, लसीकरण, चारा साठवण पद्धती ,आधुनिक पद्धतीने गोठा बांधणी , उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी तसेच  शासनाच्या विविध कर्ज योजना , शासनाच्या सवलती  व व अनुदानाविषयी माहिती आदी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांन मार्फत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे

कार्यशाळेस माफक शुल्क असेल शिक्षण कमीत कमी आठवी पास वयोमर्यादा जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत आहे तसेच कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र मिळणार आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी टि.व्ही झेंडे भ्रमणध्वनी क्रमांक  9923366882  येथे संपर्क साधावा . शेतकरी तसेच बेरोजगार युवक-युवतींनी नवीन उद्योग व आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहनही  महाराष्ट्र उद्योजकता व्दारा जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *