प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या वर कठोर कारवाई होणार – Jansanvad
आरोग्यगुन्हेगारीताज्या बातम्यापंढरपूरसोलापूर जिल्हा

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या वर कठोर कारवाई होणार

भेसळ तपासण्यासाठी महसूल पथक तयार व तपासणी सुरुवात

पंढरपूर, दिनांक 18- आषाढी एकादशीदिवशीला पंढरपूर येथे मोठया प्रमाणात यात्रा भरते. चालू वर्षी आषाढी यात्रा सोहळयाचा कालावधी दिनांक 06 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 आहे. आणि, आषाढी यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. आषाढी एकादशी ते गोपाळकाल्यापर्यंत वारकरी पंढरपूर शहरात वास्तव्यास असतात. त्यावेळी त्याचे भोजनामध्ये प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ, बासुंदी, खीर यांचा समावेश होतो.

         दूध हा विघटनशील अन्नपदार्थ असून तो लवकर खराब होवून विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. भेसळयुक्त व विघटनशिल दूधाचे पदार्थ वारक-यांच्या भोजनात आल्याने विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे. याकरीता वारक-यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अन्नपदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खिचडी यांची नमुने तपासणी प्रशासनाकडून करणेची कार्यवाही चालू आहे. तथापि, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचेत भेसळ होण्याची घटना घडत असलेची बाब निदर्शनास आलेली आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळीमुळे विषबाधा होवून वारक-यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याचे घटना घडू नये, यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ यामध्ये भेसळ करणाऱ्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

      उपरोक्त संहिते अन्वये प्राप्त अधिकारानुसार पंढरपूर शहर व परिसरातील दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, हॉटेलमधील अन्न पदार्थ यांची विक्री करणारे यांचेवर अन्न पदार्थात भेसळ करणे व अन्न विषबाधा उत्पन्न करण्यासारखी परिस्थिती उद्भवणे यास कारण ठरण्यास प्रतिबंध करीत आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, आस्थापनावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

भेसळ तपासणी पथकाची कार्यवाही सुरू-

अन्न व औषध प्रशासनासह प्रांताधिकारी, तहसीलदार  यांच्या मार्गदर्शनाखाली दूध दुग्धजन्य पदार्थ बेकरी पदार्थ हॉटेलमधील अन्नपदार्थ  या ठिकाणची तपासणी करण्यासाठी महसूल पथकेही  नेमण्यात आली असून स्वतः प्रांताधिकारी व तहसीलदार याची पाहणी करीत आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाला पंढरपूर शहर व परिसरातील सर्व हॉटेल आस्थापना बेकरीस स्वीट मार्ट प्रसाद विकणारे दुकाने आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये या अनुषंगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे तपासणीची कारवाई सुरू होती. गोपाळ काल्याला दूध व दुग्धजन्य पदार्थाचा प्रसाद आधी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते त्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थांमध् भेसळ करणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले आहेत. तरी दूध व दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या व्यक्ती व स्थापना यांनी भेसळ करू नये.

      श्री. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button