अक्कलकोटताज्या बातम्यापंढरपूरबार्शीमंगळवेढामाढा-करमाळामाळशिरसमोहोळराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर दक्षिण-उत्तरसोलापूर शहर

सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; कोणत्या तालुक्यात किती मतदार, किती महिला आणि किती पुरुष सविस्तर वाचा.

  • अंतिम मतदार यादीत 37 लाख 63 हजार 789 मतदार
  • यामध्ये पुरुष मतदार 19 लाख 35 हजार 979, महिला मतदार 18 लाख 27 हजार 508 व इतर 302 मतदारांचा समावेश
  • 6 ते 30 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान 75 हजार 824 मतदारांची वाढ

सोलापूर, दि. 30 (जिमाका): अंतिम मतदार यादी दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. अंतिम मतदार यादीत एकूण 37 लाख 63 हजार 789 मतदार आहेत. 6 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान एकूण 75 हजार 824 मतदारांची वाढ झालेली आहे. अंतिम मदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.

      दिनांक 6 ऑगस्ट 2024 च्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकुण 36 लाख 92 हजार 409 इतकी असून यामध्ये पुरूष 19 लाख 8 हजार 146, महिला 17 लाख 83 हजार 966 व इतर-297 मतदारांचा समावेश होता. दि. 30 ऑगस्ट 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण 37 लाख 63 हजार 789 इतकी मतदार संख्या असून यामध्ये पुरूष-19 लाख 35 हजार 979, महिला- 18 लाख 27 हजार 508 व इतर 302 मतदारांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी अंतिम तयार झाली असून विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्र संख्या निहाय आकडेवारी –

        244 करमाळा- एकुण 3 लाख 24 हजार 35, पुरुष 1 लाख 69 हजार 390 महिला 1 लाख 54 हजार 633 अन्य 12 तर 4737 मतदारांची वाढ झाली. तसेच 347 मतदान केंद्र आहेत.

245 माढा- एकुण 3 लाख 44 हजार 547, पुरुष एक लाख 80 हजार 547, महिला एक लाख 63 हजार 997 अन्य 3 तर मतदार संख्येत झालेली वाढ 5 हजार 339 तसेच मतदान केंद्र संख्या 355 आहे.

246 बार्शी एकुण 3 लाख 27 हजार 657, पुरुष एक लाख 69 हजार 100, महिला एक लाख 58 हजार 516 अन्य 41 तर झालेली वाढ 4719 तसेच मतदान केंद्राची संख्या 333 इतकी आहे.

247 मोहोळ (अ.जा) 3 लाख 25 हजार 999, इतकी मतदार संख्या असून मतदान केंद्राची संख्या 336 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 70 हजार 840 महिला एक लाख 55 हजार 151 अन्य आठ तर मतदारांची झालेली वाढ 4762.

248 सोलापूर शहर उत्तर – 3 लाख 22 हजार 668 इतके एकूण मतदार आहेत तर मतदान केंद्रांची संख्या 289 इतकी आहे. पुरुष मतदार 160198, महिला एक लाख 62 हजार 425 तर अन्य 45. वाढ झालेल्या मतदारांची संख्या 8199.

249 सोलापूर शहर मध्य- 3 लाख 39 हजार 608 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्राची संख्या 304 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 67 हजार 662, महिला एक लाख 71 हजार 894 अन्य 52 तर वाढ झालेल्या मतदारांची संख्या 9947.

250 अक्कलकोट- 3 लाख 74 हजार 536 एकूण मतदार असून मतदान केंद्राची संख्या 390 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 92 हजार 819, महिला एक लाख 81 हजार 676 अन्य 41. मतदार संख्येत झालेली वाढ 10171.

 251 सोलापूर दक्षिण- 3 लाख 72 हजार 553 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 362 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 91 हजार 610, महिला मतदार एक लाख 80 हजार 905 अन्य 38 तर मतदार संख्येत झालेली वाढ 10566.

252 पंढरपूर- 3 लाख 65 हजार 725 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 357 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 87 हजार 889, महिला एक लाख 77 हजार 810 अन्य 26 तर मतदार संख्येत झालेली वाढ 5874.

253 सांगोला- 3 लाख 22 हजार 240 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 305 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 67 हजार 777 महिला एक लाख 54 हजार 458 अन्य 5 तर मतदार संख्येत झालेली वाढ 6619.

254 माळशीरस (अ.जा)- 3 लाख 44 हजार 221 एकूण मतदार संख्या असून मतदान केंद्राची संख्या 345 इतकी आहे. पुरुष मतदार एक लाख 78 हजार 147, महिला एक लाख 66 हजार 43 अन्य 31 तर मतदार संख्येत झालेली वाढ 4891.

             जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघात 3723 मतदान केंद्र असून एकूण 37 लाख 63 हजार 789 मतदार संख्या आहे. 6 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान 75 हजार 824 इतक्या मतदाराची नोंदणी झालेली आहे.

             लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये एकूण 3617 मतदार केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या 3723 झालेली आहे. एकुण 3723 मतदान केंद्रापैकी शहरी 1177 व ग्रामीण भागामध्ये 2546 मतदान केंद्राचा समावेश आहे.

             तरी नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी. तसेच ज्या नागरिकांची अजूनही मतदार यादीमध्ये नावे नसतील त्यांनी निरंतर प्रक्रीयेमध्ये नाव नोंदणी करू शकतात असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

             ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेल्या अथवा काही दुरूस्ती असलेस संबधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button