ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणसंग्रामराजकीय

न्याय हक्कासाठी राज्यात चौथी आघाडी तयार झालीय? न्याय मिळत नसल्याने महा ई सेवा केंद्र चालक राज्यातील प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवार उभा करणार

न्याय हक्कासाठी राज्यात चौथी आघाडी तयार झालीय?
न्याय मिळत नसल्याने महा ई सेवा केंद्र चालक राज्यातील प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवार उभा करणार.

सोलापूर दि.२५ : महा ई सेवा केंद्र चालकांच्या २००९ पासून अनेक मागण्या आहेत. साधारण २०१४ पासून २०१४ पर्यंत केंद्र चालकांनी, संघटनानी लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनं केली. परंतु राजकीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र चालकांनी हा निर्णय घेतला.

दि.२३ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालकांची Google Meet द्वारे बैठक पार पडली. यामध्ये कोल्हापूर चे केंद्र चालक श्री.सचिनकुमार पोळ यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. यावर उपस्थित केंद्र चालकांनी होकार दर्शवला आणि त्यावर सविस्तर चर्चा करून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे आज काही केंद्र चालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर अनेक केंद्र चालकांनी अर्ज घेतले आहेत.

उर्वरित केंद्र चालकांना याबाबत माहिती मिळावी याकरिता पश्चिम महाराष्ट्र विभाग स्तरीय महा ई सेवा व आधार संघटन या संघटनेने दि.२४ रोजी महाराष्ट्रातील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालकांची Google Meet द्वारे बैठक घडऊन आणली. या बैठकीत एक-दोन अपवाद वगळता एकमुखाने निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सर्वजण अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आल्याने कागदपत्र जमा करण्यासाठी केंद्र चालकांना वेळ खूपच कमी मिळणार आहे. तरी सुद्धा वर्षानुवर्षे इतरांचे अर्ज भरण्याचा अनुभव असलेले केंद्र चालक कमी वेळेत सुद्धा जास्तीत जास्त अर्ज दाखल करतील अशी संघटनेला अपेक्षा आहे. महा ई सेवा केंद्र आणि आधार नोंदणी केंद्र चालकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे मानधन मिळत नाही. तरीही महसूल कर्मचारी, अधिकारी अतिरिक्त कामे सोपवून केंद्र चालकांना वेठीस धरतात हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

प्रशासकीय यंत्रणेकडून होणारे शोषण, २००९ पासून दरामध्ये मध्ये न झालेली वाढ, एकाच केंद्राचे १०-१० गावात चालत असलेले आयडी, वेळेवर मिळत नसलेले दाखले, शासन, प्रशासन स्तरावरून जाहीर केलेले कमिशन न मिळणे, महा ई सेवा केंद्र बंद करून केंद्र चालकांना बेरोजगार करणे, आधार ऑपरेटरना ब्लॅक लिस्ट करणे, तुटपुंजे असलेले सुद्धा कमिशन बुडवणे, केंद्र चालकांच्या सेवा कमी करून इतर यंत्रणांना देणे अशा अनेक कारणांनी महा ई सेवा केंद्र चालक वर्षानुवर्षे त्रस्त आहेत. अनेक अर्ज, निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष. पाळली न जाणारी आश्वासने यामुळे केंद्र चालक आता पेटून उठला आहे.

ग्रामपंचायत सदस्यांपासून ते खासदारांपर्यंत सर्वांचेच उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणारे केंद्र चालक मात्र वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वांचे विविध दाखले, प्रतिज्ञापत्रे आणि शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारा केंद्र चालकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत नाहीत. त्यामुळेच केंद्र चालकांना विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली आहे.

ज्या ज्या मतदार संघात केंद्र चालक उमेदवार नसेल त्या मतदार संघातील इतर पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवार केंद्र चालकांच्या हिताचे कार्य करेल, अजेंड्यावर केंद्र चालकांचा विषय असेल अशा उमेदवारास आणि पक्षास केंद्र चालक त्या त्या मतदार संघात सहकार्य करेल असे कालच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button