गुन्हेगारीताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

पारधी समाज विकास संघाचे पोलीस अधीक्षकांना संघटनेच्या सचिव भोसले यांचे निवेदन

कुर्डूवाडी प्रतिनिधी : सन २०२१ मध्ये माझ्या कुटुंबावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कुर्डूवाडी पोलीसानी अद्यापही कारवाई केली नसून अटक किंवा प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. सदरील आरोपी मोकाट असून मौजे कुर्डूतील काही नेते मंडळी यांना हाताशी धरून पुन्हा आमच्या कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला करण्याची शक्यता आहे. मला आणि माझे पती सतीश भोसले यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणार असल्याचे समजते आहे.

 

सदरील बाब गंभीर असून माझ्या कुटुंबावर भविष्यात होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याला प्रतिबंध म्हणून संबंधित आरोपींना अटक करावी, याकरिता ६ मे २०२२ रोजी कुर्डूवाडी पोलिसाना निवेदन दिले. मात्र कुर्डूवाडी पोलिसांनी याची दखल न घेता आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगून आम्हाला हाकलून दिले असल्याचे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद आहे. सदरील निवेदन मंगळवारी येथील पारधी समाज विकास संघाच्या जिल्हा सचिव अविदा सतीश भोसले यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button