अक्कलकोटताज्या बातम्यापंढरपूरबार्शीमंगळवेढामाढा-करमाळामाळशिरसमोहोळराजकीयसोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर दक्षिण-उत्तरसोलापूर शहर

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते विधानसभा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

निवडणूक आचारसंहिता काय करावे, काय करु नये, प्रचार संबंधितच्या सूचना, पेड न्यूज, प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, समाज माध्यम वापराबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांची माहिती

सोलापूर, दि. 05: – सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विधानसभा पूर्वपिठीका माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याहस्ते करण्यात आले.

 

    जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (महसूल ) अमृत नाटेकर , जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली पूर्वपिठीका माहिती पुस्तिका ही जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

   जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या निवडणूक पूर्वपिठीकेत सन १९९० ते सन २०१९ तसेच सन २०२१ पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक या सदंर्भातील माहिती देण्यात आली आहे.विधानसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम, विधानसभा मतदारनिहाय अंतिम मतदारांची आकडेवारी , विधानसभा मतदारनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त समिती, त्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.नियंत्रण कक्ष क्रमांक, निवडणूक आचारसंहिता काय करावे, काय करु नये, प्रचार संबंधितच्या सूचना, पेड न्यूज, प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, समाज माध्यम वापराबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आदींची माहिती देण्यात आली आहे.जिल्हा माध्यम कक्षचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी संपादित केलेल्या या पूर्वपिठीकेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नि-हाळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button