युवा महोत्सवातून युवक कलाकारांनी करिअर करावे -निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार – Jansanvad
ताज्या बातम्यासोलापूरसोलापूर जिल्हा

युवा महोत्सवातून युवक कलाकारांनी करिअर करावे -निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

सोलापूर दि.03(जिमाका):- शासन स्तरावरून युवकांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. करिअरच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. करिअरची क्षेत्रे वाढताहेत तसे मार्ग उपलब्ध होत आहेत. मात्र त्याची निवड करताना आपल्यातील क्षमता ओळखल्या पाहिजेत. विविध सुप्तगुणांनी व्यासपीठ देण्याच्या संधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. अशा कलाकारांनी युवा महोत्सवातून करिअर करावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 01 ते 02 डिसेंबर 2024 या कालावधीत निर्मलकुमार फडकुले सभागृह व दयानंद शिक्षण शास्त्र सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

या जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उदृघाटन निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, दयानंद शिक्षण शास्त्र महाविदयालय प्राचार्य एस.बी.क्षीरसागर, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार, क्रीडा अधिकारी नदिम शेख, सुनिल धारुरकर, दशरथ गुरव, प्रमोद चुंगे, खंडू शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

दयानंद शिक्षण शास्त्र महाविदयालयास सर्वसाधारण विजेतेपद पटकवण्याची कामगिरी केली. सौरभ वाघमारे -गोल्डनबॉय व श्रेया माशाळ-गोल्डन गर्ल मानकरी ठरले तर उत्कृष्ठ संघ व्यवस्थापक श्रीमती. बी. एस. राठोड यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात उदयास आलेली लोकनृत्य, व लोकगीते, काही तरुणांनी सादर केली. तसेच वकृत्व स्पर्धा, कथा लेखन, कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेतील चित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक पंचाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये डॉ. पंकज पवार, डॉ. सिध्दार्थ सोरटे, डॉ. मैत्रय केसकर, डॉ. केतकी रानडे, मनोज अंकुश, राजेश पवार, किरण लोंढे, संगमेश्वर बिराजदार, विशाल चव्हाण, रंजन पचवाडकर, सुमित भोसले, यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धक कलाकारांना पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल –

प्रतिक हणमंत तांदळे- चित्रकला –प्रथम. सचिन राम घंटे- चित्रकला- द्वितीय. शुभम अशोक गुळसकर- चित्रकला –तृतीय. साक्षी जितेंद्र सुराणा- काव्यलेखन- प्रथम. श्रेया प्रभाकर माशाळ- काव्यलेखन- द्वितीय

सौरथ तुळशीराम वाघमारे- काव्यलेखन- तृतीय. अॅलीस वेणुगोपाल मंदापुरे- कथालेखन- प्रथम

सेजल संतोष कवठेकर- कथालेखन- द्वितीय. आरती गुंडेराव मोहिते- कथालेखन- तृतीय. पर्जन्या निल अंजुटगी- वक्तृत्व- प्रथम. सौरभ तुळशीराम वाघमारे- वक्तृत्व- द्वितीय. श्रेया प्रभाकर माशाळ- वक्तृत्व-

तृतीय. स्वरा संगीत विद्यालय दमाणी नगर, सोलापूर- लोकगीत- प्रथम. संगमेश्वर कॉलेज सोलापूर-लोकगीत- द्वितीय. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर- लोकगीत- तृतीय. दयानंद मुलींचे वसतीगृह, सोलापूर-लोकनृत्य- प्रथम. शिवांश कला अकादमी, सांगोला- लोकनृत्य- द्वितीय. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर- लोकनृत्य- तृतीय- विशाल घंटे- छायाचित्रण- प्रथम. शुभम गुळसकर -छायाचित्रण- द्वितीय. अजय इंगळे- छायाचित्रण-तृतीय. सौरभ वाघमारे- उत्कृष्ठ कलाकार (मुलगा) . श्रेया माशाळ- उत्कृष्ठ कलाकार (मुलगी) . डॉ. बी. एस. राठोड (दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय ) -उत्कृष्ठ संघ व्यवस्थापक. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर- सर्वसाधारण विजेते पद मिळाले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button