ताज्या बातम्याराजकीयसोलापूर जिल्हा

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा


            सोलापूर दि.  2 (जिमाका) :-  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शनिवार दिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

            शनिवारदिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता रे- नगरकुंभारेता. दक्षिण सोलापूर येथे आगमन.  9.45 वा. ग्रामदैवत सिध्दरामेश्वर मंदिर- दर्शन.  सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयसोलापूर येथे आगमन व जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थिती.  नंतर पत्रकार परिषद (Press Conference). दुपारी 12.45 वा. रामवाडी सोलापूर येथे आगमन व महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबीर व विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.

  दुपारी 1.30 ते 2.15 राखीव.    2.30 वा. एम्पलायमेंट चौकसोलापूर येथील  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) कार्यालय उद्घाटन समारंभ उपस्थिती.  3.00 वा. जुनी मिल कंपाऊंड चौकसोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.  4.30 वा. जामगुंडे मंगल कार्यालयआसरा चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6.00 वा. हॉटेल बालाजी सरोवर (Hotel Balaji Sarovar) येथे अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स उपस्थिती. 


सायंकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी राखीव.  8.10 वा.मिलींद नगरबुधवारपेठ येथे राखीव.  8.45 वा. तिर्रेता. उत्तर सोलापूर येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button