ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा विधानसभेवर भगवा फडकणारच-महेश चिवटे

जनसंवाद, करमाळा : तालुक्यातील स्वार्थी व लबाड पुढाऱ्यांनी ठेकेदार व आपली बगलबच्चे मोठे करण्याचे राजकारण करून सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणावर करमाळा विधानसभा लढवून भगवा फडकवणारच असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला. बांधकाम कामगारांच्या 601 सदस्यांना भांडी वाटप व नोंदणी अर्ज भरून घेण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी मनोज राऊत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद फंड, भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष कुलकर्णी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत,
महिला आघाडी उपाध्यक्ष ज्योतीताई शिंदे,
शिवसेना ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे, युवासेना जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी, वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश शेंडगे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश शेवटी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून प्रत्येक बहिणीला भाऊ म्हणून आधार दिला आहे. करमाळा तालुक्यात 46000 लाडकी बहिणीची नोंद झाली असून यापैकी 34000 बहिणींच्या खात्यावर पैसे गेले आहेत
अजून किमान 25 ते 30 हजार लाडक्या बहिणीची नोंदणी बाकी आहे
त्यांना या हप्त्यात पैसे आले नाहीत त्यांना पुढील हप्त्यात थेट 4500 जमा होणार आहेत
वयाश्री योजनेमार्फत प्रत्येक वृद्धाला तीन हजार रुपये दिले जात आहेत

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी करमाळ्यातील शिवसेनेचा आमदार निवडून जाणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जो लाभ मिळाला आहे ते लोक शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहतील असा विश्वास व्यक्त केला

यावेळी प्राचार्य मिलिंद फंड यांनी तडाखेबाज भाषण करून
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अफवाला बळी पडू नका जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीला महिना दीड हजार मिळणार उलट हा आकडा मेहनत 3000 पर्यंत जाईल त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले

यावेळी नवीन 1300 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली

शिवसेनेच्या वतीने यापूर्वी जवळपास 2700 बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती चिवटे यांनी दिली.

वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना जवळपास दोन कोटी रुपयांची मदत झाली आहे अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना धावून जाणारी नेतृत्व म्हणून महेश चिवटे आज सर्वसामान्यांचा आधार झाले आहेत यामुळे त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व उपस्थित महिलांनी आजपासूनच कामाला लागावे असे आव्हान शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी केले.

एका घरात दोन तास कपडे धुणे भांडी केल्यानंतर महिना आम्हाला पाचशे रुपये मिळतो. आज आम्हाला 3000 रुपये मिळाले असून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. ही सर्व कृपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असून करमाळा तालुक्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या 42000 महिला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार महेश चिवटे यांनाच मतदान करणार असा विश्वास महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष सुनीता गोडगे यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button