ताज्या बातम्या

दुर्दैवी: झोपेत असलेल्या १५ वर्षाच्या मुलीवर अज्ञात व्यक्तींनी केला हल्ला.

 


कुर्डूवाडी दि.१४ : कुर्डू (कुर्डूवाडी) ता. माढा येथील शिवप्रतिष्ठान नगर येथील १५ वर्षीय मुलीवर झोपेत असताना रात्री १ च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरुन हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये अपूर्वा गणेश घुगे (वय १५ वर्ष) रा. शिव प्रतिष्ठान नगर कुर्डूवाडी ही गंभीर जखमी झाली आहे. उपचारांसाठी बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती जखमींच्या नातेवाईकांकडून मिळाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ रोजी रात्री १ वा. चे सुमारास मौजे कुर्डू शिवारातील शिदवडकर वस्ती येथील घरासमोर फिर्यादी गणेश हनुमंत घुगे, आई, वडील आणि मुलगी अपूर्वा असे चौघेजण झोपले होते. रात्री १ वाजनेचे दरम्यान  दोन अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाने अपूर्वा गणेश घुगे हिस डोक्यात मारून जखमी केले.

जखमीचे वडील गणेश हनुमंत घुगे यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमांविरुद्ध ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स.इ. गटकुळ या करीत आहेत.

०००

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 

9527271389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button