जनसंवाद/कुर्डूवाडी: माढा लोकसभा मतदार संघामध्ये कुर्डूवाडी शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन व वर्कशॉप आहे रेल्वेच्या संबंधी विविध प्रश्नाची माहिती घेऊन ते संसदेत मांडणे तसेच रेल्वे मंत्र्याकडून मंजूर करून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूवाडी शहरातील रेल्वेवर शॉप रेल्वे स्टेशन व भुयारी मार्गाची पाहणी केली.
मोहिते पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागाचे वाणिज्य प्रबंध योगेश पाटील मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रोटोकॉल अतुल लोहकरे उपस्थित होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या रेल्वे वर्कशॉपची पाहणी केली. या रेल्वेच्या वर्कशॉप मध्ये रेल्वेच्या माल वाहतूक व्यागनच्या दरुस्तीचे काम करण्यात येते आहे . दीड हजार रेल्वे कर्मचारी पूर्वी या वर्कशॉप मध्ये काम करत होते परंतु आता या वर्कशॉपला घरघर लागल्या मुळे 300 पेक्षा कमी कामगार येथे काम करत आहेत. यामुळे भविष्यात येथे काम वाढण्यासाठी मोहिते पाटील यांनी रेल्वेचे वर्कशॉप मॅनेजर जितेंद्र हराळ व उमेश कुंभार सह रेल्वेचे विविध विभागाच्या अधिकाऱ्या कडून वर्कशॉपची माहिती घेतली.
यानंतर मोहिते पाटील यांनी नव्याने उभारत असलेल्या कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्टेशन येथे नव्याने उभारत असलेल्या पाचव्या प्लॅटफॉर्मची माहिती घेतली भव्य अशा रेल्वेस्थानकाची पाहणी करून तेथे उपलब्ध होणाऱ्या विविध सेवांची माहिती घेतली. यानंतर नव्याने उभारलेल्या रेल्वे पोलीस स्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह अपंगासाठी रॅम्प तसेच एक नंबर प्लॅटफॉर्म वरून दोन नंबर प्लॅटफॉर्म जाण्यासाठी पूल बांधणे या सह विविध सूचना रेल्वे विभागाला त्यांनी केल्या.
यानंतर खासदार मोहिते पाटील यांनी गेट क्रमांक 38 येथे होत असलेल्या भुयारी रेल्वे मार्गाची पाहणी केली. गेली साडेपाच वर्ष झाले रेल्वे गेट बंद झाल्यामुळे कुर्डूवाडी शहराचे दोन भाग झालेले आहेत आता या रेल्वेच्या भुयारी मार्गामुळे कुर्डूवाडी शहर खऱ्या अर्थाने जोडले जाईल व शहरातील व्यापार पेठेवर आलेली अवकळा यामुळे दूर होणार आहे. रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांना हे काम लवकरात लवकर व चांगल्या दर्जाच्या करून घेण्याच्या सूचना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्या.
यावेळी संजय टोणपे, अमर माने, दत्ता गवळी, विजयसिंह परबत, रवी आठवले, अमीर मुलानी, सचिन वाळके, बंडू टोणपे, फिरोज खान, हमीद शिखलकर, विजय भगत, उमा आखाडे, शंकर बागल, नागा कदम, प्रदीप नितीन गोरे, सतीश चोपडे, आशा टोणपे, सोमनाथ देवकते, अजीम तांबोळी, सुरज धोत्रे, सागर शर्मा, निलोफर शेख, अलीम तांबोळी, जे पी चनागौडर, स्टेशन मास्टर, कुर्डूवाडी आनंद काळे, मुख्य वाणिज्य निरीक्षक सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .