अक्कलकोटताज्या बातम्यापंढरपूरबार्शीमंगळवेढामाढा-करमाळामाळशिरसमोहोळसरकारी योजनासोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर दक्षिण-उत्तरसोलापूर शहर
मुख्यमंत्री वयोश्री योजना : दि २४ ते ३० एप्रिल या कालावधीत शिबिराचे आयोजन

सोलापूर, दिनांक 23 (जिमाका):- राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येते.
सदर योजनेतील सोलापूर जिल्हयातील 15 हजार 716 लाभार्थ्यांचे आधार अपडेट नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ वितरित झालेला नाही. त्यामुळे दिनांक 24 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सात रस्ता, सोलापूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून, संबंधित लाभार्थ्यांनी विहीत कालावधीत आधारकार्डसह नमुद ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त, श्रीम. सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.