ताज्या बातम्या

मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूजवर करडी नजर ठेवावी-निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक

 


जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समितीला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट व कामकाजाची पाहणी

सोलापूर, (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने निर्भय व निष्पक्ष पदधतीने मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजसह सोशल मिडीयाच्या वापरावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश माढा लोकसभेचे निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक यांनी दिले.

     यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के, समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सदस्य श्रीराम राऊत, पूर्व प्रमाणीकरण युनिटचे प्रमुख रफिक शेख,

खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी किरण गायकवाड, खर्च समितीचे नोडल अधिकारी रुपाली कोळी, सहायक खर्च समितीचे वैभव राऊत आदी उपस्थित होते.

       निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असून, समाज माध्यमाद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. वृत्तपत्रात येणाऱ्या संशयीत पेड न्यूज शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ठ करावा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे समितीने कामकाज करावे. समितीने दैनंदिन पेड न्यूजचा अहवाल खर्च समितीला सादर करावा असेही श्री. बसाक यांनी सांगितले.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक यांनी आज जिल्हा माध्यम कक्षास भेट देऊन कार्यान्वित करण्यात आलेल्या जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी सदस्य अंकुश चव्हाण यांनी माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या टीव्ही युनिटच्या कामकाजाची माहिती युनिटचे प्रमुख रफिक शेख यांनी सविस्तर देऊन कशा पद्धतीने कामकाज चालते , नोंदी व रिपोर्ट कशा पद्धतीने दिला जातो याविषयी सांगितले.

डॉ श्रीराम राऊत यांनी सोशल मिडिया आणि अंबादास यादव व गणेश बिराजदार यांनी पेड न्यूज कात्रणे आणि दैनंदिन निवडणूक कार्यालायाला देण्यात येणाऱ्या अहवालाविषयी सविस्तर माहिती दिली.

         जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, उमेदवारांच्या प्रचार जाहिराती यांचे प्रमाणीकरण करण्याचे कार्यवाही केली जाते. पेड न्यूज व जाहिरात पूर्व प्रामाणिकरणाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले असून प्रिंट ,इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रतिनिधीची या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांना पेड न्यूज व जाहिरात पूर्वप्रमानीकरण याची माहिती देण्यात आल्याची माहिती समिती सदस्य सचिव श्री. सोनटक्के यांनी दिली.

     यावेळी लेखा अधिकारी सरताज शेख, माढा खर्च नियंत्रण कक्षाचे डॉ अर्चना कसबेकर, माध्यम कक्षातील शरद नलावडे, दिलीप कोकाटे, संजय घोडके, आप्पा सरवळे, धुळाप्पा जोकार, सुभाष भोपळे, नागेश क्षीरसागर, अरविंद महाले, राजेंद्र तारवाले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button