सोलापूर जिल्हा

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तलाठ्याचे अपघाती निधन.


 कुर्डूवाडी दि.१२ | कुर्डूवाडी बार्शी बाह्यवळण रस्त्यावर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तलाठ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.


शनिवार, दि. ९ डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता कुर्डूवाडी बाह्यवळण रस्त्यावर ही घटना घडली. या अपघातामध्ये तलाठी सहदेव शिवाजी काळे (वय ५५) यांचे निधन झाले.


त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बाह्यवळण रस्त्यावर फिरायला गेले असताना परिसरात धुके पसरले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी कुईवाडीतील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. कुर्डूवाडी शहर आणि परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button