ताज्या बातम्यापंढरपूरसरकारी योजनासोलापूरसोलापूर जिल्हा

रेशन मालाचे खरे लाभार्थीच रेशनपासुन वंचित.

गोरगरीबांचे रेशन कार्ड लिंक करुन रेशन माल पुरवठा सुरु करण्याची मागणी श्रीनिवास उपळकर यांनी केली

पंढरपुर (प्रतिनिधी) : शासनाकडुन पुरवठा करण्यात येणार्‍या रेशन मालाचे खरे लाभार्थीच रेशन मालापासुन वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन गोरगरीब अनेक लाभार्थ्यांचे रेशन कार्डच पुरवठा विभागाने लिंक केलेले नसल्याने अशा लाभार्थ्यांच्या हक्काचा रेशन माल दुसरेच अनेकजण ढापत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे ज्या गोरगरीब नागरिकांचे रेशन कार्डची लिंक जोडलेली नाही त्यांचे रेशन कार्ड लिंक करुन त्यांच्या हक्काचा रेशन माल त्यांना मिळण्याची तरतुद करावी अशी मागणी आम्ही एका निवेदनाद्वारे पंढरपुरचे पुरवठा अधिकारी श्री.नाईक यांच्याकडे केली असल्याची माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी दिली आहे.

 

पंढरपुर शहरातील अनेक झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे रेशन कार्ड पुरवठा खात्याकडुन आधार ला लिंक केलेले नसल्याने त्यांना रेशन माल मिळत नाही. ही बाब समोर आल्यानंतर आम्ही अशा अनेक गोरगरीब रहिवाशांना सोबत घेऊन पुरवठा विभागात गेलो, पुरवठा अधिकारी नाईक यांची भेट घेतली व उपलब्ध कागदपत्रं दिली. तेंव्हा पुरवठा अधिकार्‍यांनी यांचे उत्पन्नाचे दाखले आणा असे सांगितले. वास्तविक पुर्वी या सर्वांना रेशन माल मिळत होता परंतु आता रेशन दुकानदारांकडुन तुमचे रेशन कार्ड लिंक केले नसल्याने तुम्हाला रेशन माल मिळणार नाही असे सांगत आहेत. या सर्वांचे रेशनकार्ड पिवळे व केसरी आहे, एवढा पुरावा हे लाभार्थी असण्यासाठी पुरेसा आहे. असे पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास आम्ही आणुन दिले आहे व यांच्यासह पंढरपुरातील रेशन मालाच्या लाभापासुन वंचित असलेल्या सर्वांचे रेशन आधार ला लिंक करण्याची स्वतंत्र मोहिम राबवुन खर्‍या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली असल्याची माहिती ही यावेळी श्रीनिवास उपळकर यांनी दिली आहे.

 

महा ई-सेवा केंद्रांमधुन रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवाजवी पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे रेशनकार्ड ऑनलाईन करुन घेण्यासाठी पंढरपुर पुरवठा विभागामार्फत स्वतंत्र मोहीम राबवण्यात यावी. अशी मागणीही श्रीनिवास उपळकर यांनी केली आहे. यावेळी युवासेना विभागप्रमुख विशाल डोंगरे, राजेश नेमाडे, अमर उपळकर, स्वप्नील वाघमारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button