सोलापूर दि.7 (जिमाका):- दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम दुसरा भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरिक्षक म्हणून पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मतदार यादी निरीक्षक म्हणून दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकप्रतिनीधी, राजकीय पक्षांच्या जिल्हा अध्यक्ष यांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर याठिकाणी दुपारी 3 वाजता बैठक घेणार आहेत.
तरी मतदार यादी संदर्भात नागरीकांना काही सुचना असल्यास आजच dydeosolapur@gmail.com या ईमेलवर पाठविण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.
यावेळी विभागीय आयुक्त श्री पुलकुंडवार हे सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व नोडल अधिकारी स्वीप यांच्या कामाचाही आढावा घेतील.