कृषीताज्या बातम्यासरकारी योजनासोलापूरसोलापूर जिल्हा
जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी ५०% अनुदानावर मिळणार ही औजारे.
जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पिक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने 50 टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातुन शेतक्ऱ्यांसाठी नी पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सेंक्ट ट्रॅप, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर व विडर, पेरणी यंत्र, कल्टी व्हेटर, 5 एच पी सबमर्सिबल पंपसंच, डिझेल इंजिन,कडबाकुटटी, ताडपत्री, स्लरी इत्यादी साधने 50 टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत
इच्छुक शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, तसेच लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत. लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील. खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परिक्षण करुन ती बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असावीत.
औजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मंजूर औजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विकास अधिकारी श्री. पाचकुडवे यांनी केले आहे.
०००
बातमी आणि जाहिरातीसाठी 9527271389