ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाढा-करमाळारणसंग्रामराजकीय
करमाळा विधानसभेसाठी आज १२ उमेदवारांचे १४ अर्ज दाखल : एकूण ३५ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल: उद्या अर्जाची छाननी
जनसंवाद न्युज नेटवर्क: करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी आज बारा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी शिवसेनेतर्फे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया रामदास झोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकूण दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज पैकी त्या एकमेव महिला उमेदवार ठरल्या आहेत.
याबरोबरच माजी आमदार नारायण गोविंदराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीच नारायण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज पैकी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप नामदेवराव जगताप यांनीही अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला आहे. याबरोबरच संजय वामन शिंदे (दहिगाव), संजय लिंबराज शिंदे (खांबेवाडी) यांनी अपक्ष, उमरड येथील दत्तात्रय पांडुरंग शिंदे यांनी ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . मांगी येथील अभिमन्यू अवचर यांनी अपक्ष तर विकास आलदर (रासप) चौबे पिंपरी, सागर लोकरे (अंबड) यांनी मनसेतर्फे, सिद्धांत वाघमारे (भीमानगर) यांनी अपक्ष, निवृत्ती पाटील (बारलोणी) यांनी अपक्ष तर संभाजी भोसले (जिंती) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
आज (ता.२९) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या( ता ३०) ऑक्टोबर रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. आज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असताना फक्त बारा इच्छुकानेच उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत. हे सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी स्वीकारले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा.
9421756655, 9527271389