राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांच्या कारवाईत ८२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; १५९ गुन्हे नोंद :२७ वाहनांसह मुद्देमाल जप्त
Jansanvad2 days ago
0 1 minute read
सोलापूर, दि.6:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क,विभागाच्या भरारी पथकांकडून जिल्हयात अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक आदी प्रकरणात कारवाई करुन 159 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये 82 लाख 24 हजार 567 रुपये किंमतीचा 27 वाहनांसह दारू बंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
या पथकामार्फत दि.05नोव्हेंबर 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, व दुय्यम निरीक्षक कुर्डुवाडी पथक क्र. .1 व 2 आणि 3 यांची संयुक्त गुन्हा अन्वेषण धडक कारवाई मध्ये बार्शी शेळगांव रोड ता.बार्शी येथे रात्री अवैध हातभट्टी दारू वाहतूक करणारी एक बोलेरो पीकअप वाहन क्र. एम.एच. 13डीक्यू 4127 यामध्ये 900 लीटर हातभट्टी दारू सह जप्त करण्यात आले असून एकूण 8 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच घोडा तांडा, भोजाप्पा तांडा, व सोलापूर शहर परिसरात केलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर वाहतूक करणा-या वाहनांवर केलेल्या कारवाईत 5 हजार 300 लीटर गुळमिश्रीत रसायन 700 लीटर हातभट्टी दारू, एक बोलेरो जीप व एक ईर्टीका कारसह 12 लाख 77 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत एकुण सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून सोलापूर जिल्हयात एकूण 159 गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण 27 वाहनांसह रुपये 82 लाख 24 हजार 567 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरी भागात बिअर शॉपीवर पिण्याची व्यवस्था करण्या-या शॉपीवर नियम भंग कारवाई नोदविण्यात आली आहे. ज्याप्रमाणे वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक त्याप्रमाणे मद्य सेवनासाठी ही परवाना आवश्यक असतो. याची नोद घ्यावी. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणीही अवैध मद्यसेवनाच्या प्रलोभनास बळी पडू नये असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच अवैध मद्यविक्री अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल. अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.